Pik Vima Vatap: पिक विम्याची रक्कम 31 मे पर्यंत शेतकऱ्यांना द्या विमा कंपन्यांना राज्य सरकारचे आदेश

Pik Vima Vatap: प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2022 crop insurance beneficiary list 2020 मधील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पीक कंपन्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाई रकमेचे 31 मे पर्यंत वाटप करण्यात येणार. अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेमध्ये सांगितली.

crop insurance: विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भाविषयी प्रश्न उपस्थित केला होता. याचवेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की प्रधानमंत्री पिक विमा योजना (crop insurance scheme) राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्ड, युनायटेड इंडिया कंपनी, एचडीएफसी ॲग्रो आणि बजाज आलियान्झ या 5 विमा (crop insurance status) कंपन्या मार्फत राबविण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये हंगाम प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई यामध्ये शेतकऱ्यांकडून एकूण प्राप्त झालेल्या तक्रारी, नुकसान भरपाई लाभार्थी संख्या याचा वेळोवेळी आढावा मंत्रालयीन स्तरावर पिक विमा कंपन्याकडून घेण्यात येतो.

crop insurance: जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी हे पिक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींचा नियमित आढावा घेत राहतात. अजून 15 दिवसात या पिक विमा कंपन्यांनी फेटाळलेल्या अर्जाची पुन्हा एकदा तपासणी करून कार्यवाही करण्याचे कंपन्यांना निर्देश दिले जातील. शेतकऱ्यांना निश्चितच नुकसान भरपाई दिली जाणार आहे. असे स्पष्ट सांगितले आहे. 5 पिक विमा कंपन्याकडे आतापर्यंत 9 लाख 51 हजार प्रकरणे प्रलंबित आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 2861 कोटी एवढी नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे.

ऑनलाईनला सर्वर डाऊन, ऑफलाइनला ऑफिस बंद | Pik Vima Vatap

Pik Vima Vatap: राज्यामधील शेतकऱ्यांचा पिक विमा अजूनही प्रलंबित असून, शेतकरी ऑनलाइन नोंदणी करायला गेले तर सर्व डाऊन दाखवते. ऑफलाइन नोंदणी करायला गेले तर ऑफिसच बंद असते. पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींची मनमानी एवढी वाढली आहे की, आमदार आणि जिल्हाधिकारी यांनी लावलेल्या बैठकीला पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी गैरहजर असतात. यामध्ये कहर, म्हणजे आता कृषिमंत्री ज्या पद्धतीने बोलत आहे ते पाहून कृषी मंत्री हे पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी आहेत का अशी शंका वाटते. असा होतो तोला भाजपचे प्रवीण पोटे पाटील यांनी मारला.

Leave a Comment