शेतकरी बांधवांनी या खरीप हंगामात एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत.
तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी तीन दिवसांची मुदत वाढ देण्यात आली असल्याचे मुंडे म्हणाले. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज तीन ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरुन घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं.
मंजुर यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पीक विमा योजनेतून केवळ एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरवता येतो. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पार पडते. पण गेल्या अनेक दिवसांपासून पिक विमा उतरवताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
अनेक जिल्ह्यातील शेतकरी सीएससी सेंटरवर पिक विमा अर्ज भरण्यासाठी चकरा मारत होते, पण ऑनलाईन फॉर्म भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तर काही जणांनी तर सीएससी सेंटरवरच थांबणं पसंत केलं होतं.
मुद्रा लोण घेण्यासाठी आणि त्याची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पीक विमा भरण्यासाठीची वेबसाईट सतत हँग होत असल्याने शेतकऱ्यांना दिवस-दिवस सीएससी सेंटरवर बसून राहावं लागत होतं. अशातच पिक विमा भरण्यासाठी देण्यात आलेली शेवटची तारीख जवळ येत चालली होती.
बळीराजाच्या याच मागणीचा विचार करुन राज्य सरकारनं तशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. राज्याची हीच विनंती मान्य करत आता पिक विमा भरण्यासाठी केंद्राकडून 21 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
यादीत नाव नसेल तर करा हे काम..!
Wow, amazing weblog structure! How lengthy have you ever been blogging for?
you make running a blog glance easy. The overall look of your site is magnificent,
as smartly as the content material! You can see similar here sklep internetowy