PM Kisan | मोठी बातमी ! अखेर मे महिन्यात जमा होणार 4,000 रुपये

जॉईन व्हॉट्सॲप ग्रूपजॉईन करा
जॉईन टेलेग्राम ग्रूपजॉईन करा

PM Kisan |शेती उत्पादन व शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासनाकडून नवनवीन अशा अनेक योजना राबविल्या जातात. पंतप्रधान किसान योजना (PM Kisan Scheme) ही यामधीलच एक योजना आहे. देशभरातील जवळपास 8-9 कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. दरम्यान प्रधानमंत्री किसान योजने नुसार राज्य सरकारने (State Government) देखील नवीन नमो शेतकरी योजना आणली आहे.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ असे या राज्य सरकारच्या नवीन योजनेचे नाव आहे. या योजनेचा पहिला हप्ता केव्हा मिळणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. परंतु आता या योजनेचा पहिला हप्ता मे महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मे महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 ऐवजी आता 4,000 जमा होणार आहे.

PM Kisan शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये मिळणार

केंद्रसरकारच्या पीएम किसान योजनेमधून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळतात. हे 6,000 हजार रुपये तीन हप्त्यात दिले जातात. दरम्यान आता राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून देखील शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सरकार कडून वार्षिक 12,000 रुपये मदतीच्या स्वरुपात मिळणार आहेत. (Namo Shetkari Mahasanman Nidhi)

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रमाणावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ चालू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ही योजना सुरू केली आहे. यावर्षीच्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्सयमंत्र्यांनी याबाबत घोषणा केली होती.

ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहे. यामुळे फक्त महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील जवळपास ९६ लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा लाभ मिळणार आहे. डबल रक्कम मिळणार असल्याने राज्यातील शेतकरी सुद्धा सध्या आनंदी आहेत.

Leave a Comment