PM Kisan | शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार पीएम किसानचा 13 वा हप्ता, जाणून घ्या वेळ

PM Kisan | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. सर्व ठीक राहिल्यास, सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 रोजी पीएम किसान सन्मान (pm kisan status) निधीच्या 13 व्या हप्त्याचे पैसे देशामधील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केले जातील. बातम्यांनुसार, पंतप्रधान मोदी 27 फेब्रुवारीला पीएम किसान योजनेचा (pm Kisan 13th installment) 13 वा हप्ता जारी करू शकतात.

कधी होणार हप्ता जमा? PM Kisan

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारी 2023 रोजी देशात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता (PM Kisan Yojana) जारी करणार आहेत. या दिवशी 13 व्या हप्त्यासाठी 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहेत. केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारीला कर्नाटकचा दौरा करणार आहेत. पीएम मोदी दुपारी 3:15 वाजता कर्नाटकातील बेलागावी येथे पोहोचतील, जिथे अनेक विकास उपक्रमांची पायाभरणी करण्यासोबतच पीएम किसानच्या 13व्या हप्त्याचेही विमोचन करतील. PM मोदी 13व्या हप्त्याची रक्कम DBT द्वारे 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहेत.

पी एम किसान चा हप्ता बघण्यासाठी येथे क्लिक करा

जॉईन व्हॉट्सॲप ग्रूपजॉईन करा
जॉईन टेलेग्राम ग्रूपजॉईन करा
जॉईन

2 thoughts on “PM Kisan | शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार पीएम किसानचा 13 वा हप्ता, जाणून घ्या वेळ”

Leave a Comment