PM Svanidhi Yojana: PMSA स्वनिधी योजनेंतर्गत धुळे महापालिकेतर्फे 2 हजार 454 लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यामधील, तर ५८६ लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील कर्ज वितरित करण्यात आलेले आहे.
दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील ५० हजारांच्या कर्जासाठी लाभार्थ्यांनी अर्ज (Form Apply) करावे, असे आवाहन महापौर, आयुक्तांसह इतर पदाधिकारी, अधिकारी यांनी केले आहे. (PM Svanidhi Yojana Loan disbursement to two half thousand beneficiaries Apply for third phase loan dhule news)
शहरातील पथविक्रेता, भाजीपाला, चहा हॉटेल, नाश्ता गाडी, फेरीवाले/दूध, कटलरी, पानटपरी, फूल विक्रेता आदी वस्तू विक्रेत्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. एकूण 2 हजार 959 लाभार्थ्यांना बँकेने कर्ज मंजूर केले असून, त्यांपैकी २ हजार ४५४ लाभार्थ्यांना कर्जवाटप सुद्धा करण्यात आलेले आहे.
PM Svanidhi Yojana: https://www.india.gov.in/spotlight/pm-street-vendors-atmanirbhar-nidhi-pm-svanidhiअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच प्रथम टप्प्यात १० हजार कर्ज उपलब्ध झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बँक २० हजार रुपये कर्ज देते. यामध्ये आतापर्यंत ५८६ लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील २० हजार रुपये कर्ज वितरित झालेले आहे.
५० हजारांसाठी अर्जादरम्यान दुसऱ्या टप्प्यातील कर्जफेडीनंतर लाभार्थ्याला तिसऱ्या टप्प्यातील ५० हजार रुपये कर्ज देण्यात येते. यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज करणे गरजेचे आहे.
ई-सेवा केंद्रातून हा अर्ज भरू शकता. शहरातील जास्तीत जास्त पथविक्रेते/फेरीवाल्यांनी योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन महापौर प्रतिभा चौधरी, आयुक्त देवीदास टेकाळे, महापौर नागसेन बोरसे यांनी केले आहे.