PM Vishwakarma Yojana | मोठी बातमी! मोदी सरकारने आणली नवी योजना; आता 5 टक्के व्याजदराने ‘या’ लोकांना मिळणार 1 लाखांच कर्ज

PM Vishwakarma Yojana | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याच्या एका दिवसानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पीएम विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली असून. या योजनेअंतर्गत (PM Vishwakarma Yojana) 5 वर्षांमध्ये 13 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कुशल कामात गुंतलेल्या कामगारांना स्वस्त व्याजावर कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य हेतु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी या योजनेची घोषणा केली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर ते लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत होते. त्याचवेळी, कौशल्याशी संबंधित कामांमध्ये गुंतलेल्या कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा योजना सुरू केली जाणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

किती रक्कम खर्च केली जाईल? – PM Vishwakarma Yojana

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक स्वातंत्र्यदिनाच्या नंतर म्हणजेच बुधवारी, 16 ऑगस्ट रोजी झाली. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर योजनेच्या मंजुरीची माहिती सांगितली. म्हणाले की केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली असून, या योजनेसाठी 13,000 कोटी रुपये खर्च केले जातील.

30 lakh artisans will benefit | 30 लाख कारागिरांना फायदा होणार

पीएम विश्वकर्मा योजने मार्फत आर्थिक वर्ष 2023-24 ते व आर्थिक वर्ष 2027-28 या पाच वर्षांत 13,000 कोटी रुपये खर्च करण्यात येतील. 17 सप्टेंबरपासून विश्वकर्मा जयंतीनिमित्त ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत अशा कामगारांना लाभ होणार आहे, जे कौशल्याशी संबंधित कामात गुंतलेले आहेत आणि जिथे गुरु-शिष्याची परंपरा अजून देखील चालू आहे. या योजनेचा 30 लाख पारंपारिक कारागिरांना मिळणार होणार असल्याचे मंत्री म्हणाले.

Who will benefit from PM Vishwakarma Yojana? | पीएम विश्वकर्मा योजनेचा कोणाला होईल फायदा?

लोहार, कुंभार, गवंडी, फुलविक्रेते, मासे जाळे विणणारे, धोबी, लॉकस्मिथ, शिल्पकार इत्यादींची गणना केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ होणार्‍या संभाव्य कारागिरांमध्ये होणार आहे. केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्थेत या लोकांचे मोठे योगदान ठरले आहे. त्यामुळे त्यांना डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कौशल्य विकास अभ्यासक्रम

पीएम विश्वकर्मा योजने मार्फत, अधिक कौशल्ये कशी विकसित करता येतील याकडे लक्ष दिले जाईल आणि पारंपारिक कामगारांना नवीन प्रकारची उपकरणे आणि डिझाइनची माहिती मिळावी. या योजनेंतर्गत पारंपारिक कामगारांना आधुनिक उपकरणे खरेदीसाठीही मदत केली जाईल. योजनेंतर्गत, मूलभूत आणि प्रगत असे दोन प्रकारचे कौशल्य विकास अभ्यासक्रम आयोजित केले जातील. कोर्स करणाऱ्या कामगारांना सरकारकडून स्टायपेंड दिला जाणार आहे. 500 रुपये प्रतिदिन या दराने स्टायपेंड मिळेल.

How can you get financial help under PM Vishwakarma Yojana? | पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत आर्थिक मदत कशी मिळेल?

पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे, ज्यावर जास्तीत जास्त 5 टक्के व्याजदर असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पात्र कामगारांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सवलतीचे कर्ज दिले जाईल. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत कारागीर आणि कारागीरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्रही दिले जाईल. आधुनिक उपकरणे खरेदी करण्याकरिता 15,000 रुपये दिले जाणार आहे.

Leave a Comment