PMC Recruitment 2023: भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत, पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.
पुणे शहरामध्ये राहणाऱ्या आणि पुणे महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे पुणे महानगरपालिका (PMC) येथे विविध पदांसाठी भरती काढली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
ही भरती रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक, पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक, कंपाउंडर इत्यादी जागांसाठी होणार आहे. याबाबतची जाहिरात पालिकेने ६ मार्च २०२३ ला प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत, पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
PMC Recruitment 2023: या पदांसाठी होणार भरती येथे पहा
ही भरती एकूण ३२० जागांसाठी होणार आहे. (वर्ग I, II आणि III)