Pocra पोखरा योजनेतून 393000 हजार शेतकऱ्यांना मिळाले अनुदान

जॉईन व्हॉट्सॲप ग्रूप

Pocra गाव शेतकरी वाड्यावर त्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून मराठवाड्यामधील 2500 गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे ‘पोकरा’ प्रकल्पाद्वारे एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत 3,93,000 शेतकऱ्यांना 1,963 कोटी 83 लाख रुपये अनुदान मिळाले आहे. या प्रकल्पामध्ये सहभागी गावातील सुमारे 6,65,462 एवढ्या शेतकऱ्यांनी या योजनेद्वारे नोंदणी केली आहे.

पोखरा योजनेसाठी मराठवाड्यातील 2,627 गाव निवडलेली आहे. या निवडलेल्या गावांमधून सुमारे 6,65,462 शेतकऱ्यांनी या प्रकल्पा अंतर्गत नोंदणी केली. या शेतकऱ्यांकडून जवळपास 16,13,532 अर्ज विविध घटकांसाठी प्राप्त झाले आहे. त्यापैकी 3,93,000 एवढ्या शेतकऱ्यांना अवजारे बँक, फळबाग आणि इतर विविध योजनांसाठी सुमारे 1,963 कोटी 83 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा योजनेच्या जास्त आघाडीवर आहे.

1 thought on “Pocra पोखरा योजनेतून 393000 हजार शेतकऱ्यांना मिळाले अनुदान”

Leave a Comment