Police Constable Exam: ओरोस – जिल्हा पोलीस भरती Constable Exam मधील पोलीस शिपाई Police Exam पदासाठी लेखी परीक्षेस पात्र असणाऱ्या ११८८ विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा २ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता कुडाळ येथील संत राऊळ महाराज कॉलेज, कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक इंग्लिश स्कूल व कुडाळ हायस्कूल या 3 केंद्रांवर घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सांगितली आहे.
Police Constable Exam
जिल्हा पोलिस दलातील २०२१ मधील रिक्त कॉन्स्टेबल ९९ पदांसाठी मैदानी ५ ते ११ जानेवारी कालावधीत जिल्हा पोलिस मैदानावर घेण्यात आलती. २०२१ मधील रिक्त पदांच्या आधारे ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. चालक पदाच्या २३ जागांसाठी 2,१२६ तर कॉन्स्टेबल पदाच्या ९९ जागांसाठी ५,९५८ अर्ज प्राप्त झाले होते. यामधील चालक पदासाठी २ ते ४ जानेवारी कालावधीत तर कॉन्स्टेबल पदासाठी ५ ते ११ जानेवारी या वधीत शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आलती.
तेव्हा विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे 1:10 या प्रमाणे लेखी परीक्षेसाठी प्रवर्ग (Police Constable Exam) व समांतर आरक्षण निहाय निवड यादी तयार करण्यात आली आहे. याप्रमाणे लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल पदाच्या एकूण ९९ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात असून एकूण ११८८ विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. लेखी परीक्षेसाठी जाहीर करण्यात आलेल्या ११८८ उमेदवारांच्या यादीत ९३१ पुरुष उमेदवारांची नावे उपलब्ध आहेत.
५९ माजी सैनिक व १९६ महिला उमेदवारांची नावे यादीमध्ये आहेत. लेखी परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र हे ‘महाआयटी’ MAHAIT मार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी 2 तास अगोदर पोहोचणे बंधनकारक आहे. याविषयी काही समस्या असल्यास उमेदवारांनी पोलीस नियंत्रण कक्षावर संपर्क करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.