Pradhan Mantri Awas Yojana pdf list : घरकुल योजनेच्या लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी मित्रांनो घरकुल योजनेमध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असेल प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत आवाज प्लस नावाचा सर्वे करण्यात आला होता या सर्वे मध्ये जर तुम्ही फार्म भरला असेल तर आता याद्यांमध्ये नावे येण्यास सुरू झालेले आहेत अनेक लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत आणि जे लाभार्थी पात्र राहून त्यांच्या यादीमध्ये नाव येत नव्हतं आणि ज्या लाभार्थ्यांचे नावे पात्र यादीमध्ये आले होते त्यांना मंजुरी मिळाली नव्हती परंतु आशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पहिला हप्ता सुद्धा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जे लाभार्थी विनाकारण अपात्र राहिलेले आहेत मग आशा लाभार्थ्यांना सुद्धा पात्र करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत जे लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अपात्र झालेले आहेत आशा लाभार्थ्यांना आता पात्र करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पारधी आवास योजना शबरी आवास योजना रमाई आवास योजना राबवल्या जात आहे.
तुमचा मोबाईल फोन वापरून घरकुल योजना 2023 ची ऑनलाइन यादी तपासण्यासाठी तुम्ही https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx या वेबसाइटला भेट देऊ शकता. परंतु तुम्हाला तुमचा मोबाईल फोन वापरून यादी तपासण्यासाठी मदत हवी असल्यास, तुम्ही खालील लिंक वापरू शकता. ही लिंक तुम्हाला स्टेप बाय स्टेप यादी कशी तपासायची ते दाखवेल. कृपया लक्षात घ्या की ही पद्धत फक्त ग्रामीण भागांसाठी कार्य करते. जर तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीची आवश्यकता असेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या. घरकुल योजनेची यादी तुमच्या मोबाईल फोनवर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Transfer यादी कशी पाहायची?
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला pmay.nic.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर Pradhan Mantri Awaas Yojana – Gramin नावानं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. Pradhan Mantri awaas Yojana- Gramin, Guidelines आणि Cirulars असे तीन पर्याय तुम्हाला तिथं दिसतील.यापैकी पहिल्या म्हणजेच Pradhan Mantri awaas Yojana- Gramin या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणची वेबसाईट ओपन होईल.
यामध्ये तुम्हाला ग्रामीण विकास मंत्रालयाचं किती घरकुलांचं उद्दिष्ट आहे, त्यासाठी किती जणांनी नोंदणी केली आहे, त्यापैकी किती प्रस्ताव मंजूर झाले आहेत, त्यापैकी किती घरकुलांची कामं पूर्ण झाली आहेत आणि त्यासाठी किती कोटी रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे, याची माहिती दिसेल.
आता तुम्ही घरकुलासाठी अर्ज केला असेल तर ते मंजूर झालं की नाही ते कसं पाहायचं त्याची माहिती पाहूया.
यासाठी तुम्हाला वरच्या बाजूला असलेल्या Awaassoft या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यातील दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय आहे report. यावर क्लिक केलं की एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं वेगवेगळे रिपोर्ट दिलेले तुम्हाला दिसून येतील. त्यातील सगळ्यात शेवटच्या Social Audit Reports मधील Beneficiary details for verification यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर MIS Report नावाचं एक पेज ओपन होईल. यापेजवर selection filters या पर्यायाखालील एक एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. Filters
- सुरुवातीला राज्य, त्यानंतर जिल्हा, मग तालका आणि सगळ्यात शेवटी गाव निवडायचं आहे. हे निवडून झालं की मग तुम्हाला कोणत्या वर्षीची यादी पाहायची आहे ते वर्ष निवडायचं आहे.
- त्यानंतर कोणत्या योजनेतील घरकुल लाभार्थ्यांची यादी पाहायची आहे ती योजना निवडायची आहे.
- इथं तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, All central schemes, All states schemes, राजीव गांधी आवास योजना, मुख्यमंत्री आवास योजना…अशा दिलेल्या योजनांपैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे.
- आता आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण या योजनेतील यादी पाहायची असल्यानं आपण ती योजना निवडली आहे.
- त्यानंतर समोर दिलेल्या बेरीज किंवा वजाबाकीच्या प्रश्नाचं उत्तर कॅप्चाच्या रकान्यात टाकायचं आहे.
- आणि मग सगळ्यात शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी ओपन होईल.
- याप्रकारे तुम्ही तुमच्या गावातील कोणत्या योजनेअंतर्गत कुणाला घरकुल मंजूर करण्यात आलं, याची माहिती पाहू शकता.