Ration Card New Update
Ration Card New Update: राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना 14 जिल्ह्यांमध्ये 40 लाख शेतकरी लाभार्थ्यांना स्वस्त दरात धान्य देण्याची योजना बंद करण्याच्या निर्णयावरून नागरिकांमध्ये नाराज होताना दिसत आहे. आता धान्या ऐवजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याची योजना सुरु होणार आहे.
New Food Security Card : राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 59 हजार ते 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २ रुपये किलो गहू आणि ३ रुपये किलो तांदूळ स्वस्त रेशन धान्य दुकानातून देण्याची योजना सुरू करण्यात आली होती. केंद्र सरकार या योजनेतून धान्य देत होते. काही कारणामुळे ही योजना बंद करण्यात आली होती. या रेशन धारकांना जुलै २०२२ पासून गव्हाचे व सप्टेंबर २०२२ पासून तांदळाचे वाटप बंद करण्यात आलते.
रेशन कार्ड धारकांना रेशन ऐवजी पैसे देणारी योजना नक्की काय आहे? यासाठी सर्व माहिती वाचा (Ration Card New Update)
महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मार्फत रेशन कार्डधारकांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांकरता चालू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लवकरच या योजनेवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे व त्यानंतर ही योजना लवकरच सुरू करण्यात येईल.
फक्त या 14 जिल्ह्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.
Ration Card New Update: रेशन कार्ड धारकांना धान्या ऐवजी पैसे देणारी ही योजना खालील प्रमाणे राबविण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत एका व्यक्तीला एका महिन्याच्या रेशनसाठी १५० रुपये मिळणार आहे. जर समजा तुमच्या कुटुंबात 5 व्यक्ती असतील. तर तुम्हाला महिन्याला 750 रुपये मिळतील. म्हणजे वर्षाला ९,००० हजार रुपये मिळतील. Ration card beneficiary farmer scheme
या योजनेअंतर्गत एक बातमी समोर येत आहे की, यामध्ये एक नियम असणार आहे, कुटुंबातील महिला सदस्यांच्या बँक खात्यात सर्व कुटुंबातील व्यक्तींचे रेशनचे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर त्या महिलेचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक राहणार आहे.
फक्त याच 14 जिल्ह्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे