खुशखबर! आता 15 हजार रुपये मिळणार

राज्यातील कोतवालांसाठी मोठी खुशखबर आहे. आता कोतवालांचे मानधन वाढवण्यात आले आहे. कोतवालांच्या मानधनवाढीला राज्याच्या वित्त विभागाची नुकतीच मान्यता मिळाली आहे. कोतवालांचे मानधन आता 7 हजार 500 वरून 15 हजार रुपये होणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी राज्याचा सन 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा कोतवालांच्या मानधनवाढीबाबत घोषणा केली होती. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीबाबत सादर प्रस्तावास मंत्रिमंडळाने दिनांक 17 मार्च, 2023 रोजीच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालांना मिळत असलेले मानधन 7 हजार 500 रुपयावरून 15 हजार करण्यात येणार आहे. 

राज्यातील सर्व 12 हजार 793 कोतवालांना यापुढे दर महिन्याला सरसकट 15 हजार इतके मानधन लागू करण्यात आले आहे. माहीतीनुसार, 15 हजार रुपये इतके मानधन दि. 01 एप्रिल 2023 पासून अनुज्ञेय असणार आहे, अशी माहीती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

Leave a Comment