School Holiday : शाळांना सुटी असताना कितीही शाळेत जावेसे वाटले तरी शाळा सुरू झाल्यावर मात्र कधी एकदा शाळेला सुटी लागते, असं अनेकदा विद्यार्थ्यांना वाटत असता. विद्यार्थ्यांना दिलासा देणारी एक माहिती आम्ही देणार आहोत. या वर्षातील सुट्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळांना ७८ दिवस सुटी मिळणार आहे. त्यात सार्वजनिक सण धरून ४२ सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. २०२३ – २४ हे शैक्षणिक वर्ष ३० एप्रिल रोजी संपेल. त्यानंतर १४ जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुटी असते. १५ जूनपासून पुढील शैक्षणिक वर्षाची सुरवात होणार आहे.
१ ऑगस्ट ते ३० एप्रिल या नऊ महिन्यातील या सुट्ट्या आहेत. यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले. सरकारी यादीनुसार, सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांनुसार, २९ जूनला आषाढी एकादशीची सुटी होती. त्यानंतर २९ जुलैला मोहरमची सुटी असेल. स्वातंत्र्य दिनापासून महावीर जयंतीपर्यंत शाळांना ४२ सुट्या असतील. यात रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश नाही. या शासकीय सुट्या बॅंकांसह सर्वच शासकीय विभागांना लागू आहेत. दरम्यान, सध्या जोरदार पाऊस होत असल्याने आणि दरडी कोसळण्याच्या घटना पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शाळांना सुट्ट्या देण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, उन्हाळी सुटी ४४ दिवसांची असणार आहे. १ मे २०२४पासून या सुट्या असतील.
पुढील सुट्ट्या कशा असतील
मोहरम (२९ जुलै), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), पारशी नववर्ष (१६ ऑगस्ट), रक्षाबंधन (३० ऑगस्ट), शिक्षक दिन (५ सप्टेंबर), गणेश चतुर्थी (१९ सप्टेंबर), गौरी पूजन (२१, २२ सप्टेंबर), अनंत चतुर्दशी, ईद-ए-मिलाद (२८ सप्टेंबर), महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर), घटस्थापना (१५ ऑक्टोबर), दसरा (२४ ऑक्टोबर), दिवाळी सुट्टी (९ ते २५ नोव्हेंबर), गुरूनानक जयंती (२७ नोव्हेंबर), ख्रिसमस (२५ डिसेंबर), नवीन वर्ष (३१ डिसेंबर – १ जानेवारी), हुतात्मा दिन (१२ जानेवारी), भोगी, मकरसंक्रांत (१४ – १५ जानेवारी), प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी), महाशिवरात्री (८ मार्च), धूलिवंदन (२५ मार्च), गुड फ्रायडे (२९ मार्च), रंगपंचमी (३० मार्च), गुढीपाडवा (९ एप्रिल), रमझान ईद (१० एप्रिल), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), श्री रामनवमी (१७ एप्रिल), महावीर जयंती (२१ एप्रिल) व महाराष्ट्र दिन (१ मे).
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा