School Holidays : शाळा सुट्ट्यांची यादी जाहीर, तब्बल ७८ दिवस सुट्ट्या!

School Holidays : यंदाच्या शैक्षणिक वर्षात १ ऑगस्ट ते ३० एप्रिल या नऊ महिन्यात शाळांना ७८ दिवस सुटी असणार आहे. त्यात सार्वजनिक उत्सवाच्या ४२ तर दर महिन्यातील चार रविवार, अशी सुट्यांची यादी शासकीय विभागांकडून जाहीर करण्यात आली आहे.१५ जूनपासून यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. सुट्यांच्या शासकीय यादीनुसार, आषाढी एकादशी निमित्ताने, २९ जूनला सुटी होती. आता २९ जुलैला मोहरमनिमित्त सुटी असणार आहे. त्यानंतर १ मे रोजी महाराष्ट्र व कामगार दिनाचीही सुटी असेल.

 

तत्पूर्वी, स्वातंत्र्य दिनापासून महावीर जयंतीपर्यंत शाळांना रविवार वगळून ४२ सुट्या असणार आहेत. बहुतेक शाळांनी सुट्यांची यादी पालकांना पाठविली आहे. या शासकीय सुट्या बॅंकांसह सर्वच शासकीय विभागांसाठी लागू असणार आहेत. दरम्यान, सध्या पावसाळा सुरू असल्याने अतिवृष्टी काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातून देखील शाळांना सुट्या दिल्या जात आहेत. School Holidays List

 

येथे क्लिक करून पहा सुटयांची यादी

1 thought on “School Holidays : शाळा सुट्ट्यांची यादी जाहीर, तब्बल ७८ दिवस सुट्ट्या!”

  1. Wow, wonderful weblog structure! How lengthy have you been blogging for?
    you made running a blog glance easy. The entire look of
    your site is magnificent, as well as the content material!
    You can see similar here dobry sklep

    Reply

Leave a Comment