Shettale Yojana: महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षात झालेल्या अनियमित पावसामुळे कोरडवाहू जमिनी पावसावर अवलंबून असलेल्या पिकांचा विपरीत परिणाम होत आहे. पाणी व पावसामुळे पिकांची नुकसान होऊ नये म्हणून शेततळ्यासाठी अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यातील कोरडवाहू शेतीसाठी जलसंधारण व जलसंधारणाच्या माध्यमातून सिंचनाची उपलब्धता वाढवून दुष्काळावर मात करून कृषी उत्पादनात स्थिरता आणणे हा हेतू आहे. तसेच संरक्षित आणि शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारने मागील त्याला शेततळे योजना सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.
मागेल त्याला शेततळे योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पात्रता काय?
ज्या शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर म्हणजेच दीड एकर जमीन उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना शेततळे योजनेचा लाभ मिळू शकतो.
शेततळे योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी यापूर्वी घेतलेला नसावा.
लाभार्थी शेतकऱ्याची जमीन तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक.
या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केली आहे म्हणजे त्यांच्या वारसांची निवड प्रक्रियेत प्राधान्य पद्धतीने निवड केली जाईल.
Shettale Yojana: मागेल त्याला शेततळे योजना आवश्यक कागदपत्रे पहा
- लाभार्थी आधार कार्ड
- जमिनीचा 7/12
- जमिनीचा 8 अ उतारा
- शेततळ्यासाठी खरेदी करण्याचे साधन किंवा उपकरणाचा कोटेशन
- मान्यता प्राप्त कंपनीचे टेस्टिंग रिपोर्ट
- लाभार्थी जात प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक
- हमीपत्र पूर्व संमती पत्र शेतकरी करारनामा
- बँक पासबुक
- मोबाईल क्रमांक