Kusum Solar | कुसुम सोलर योजना पेमेंट ऑप्शन आले साईट चालत नाही येथे पहा सर्व माहिती?

Kusum Solar

Solar | कुसुम सोलर योजना पेमेंट (Payment) ऑप्शन आले साईट चालत नाही?

Kusum Solar Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो दिनांक 9 10 2023 या तारखेला कुसुम सोलर योजना या योजनेअंतर्गत पैसे भरण्यासाठी मेसेज आलेले आहेत. पण कुसुम सोलर योजना साईट व्यवस्थित चालत नसल्याने शेतकऱ्यांची परेशानी होत आहे. अशातच कुसुम सोलर योजना या योजनेला पैसे भरण्यासाठी नवीन अपडेट आलेले आहे. म्हणजे तुम्हाला जो पैसे भरा, असा मेसेज आलेला आहे. त्या मेसेज मध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरती जाऊन तुम्हाला त्या ॲप डाऊनलोड करून मोबाईल नंबर ने लॉगिन करायचे आहे.

मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ॲप मध्ये लॉगिन करून नेमकं करायचं काय? तर मित्रांनो आपण याविषयीच या लेखांमध्ये माहिती सांगणार आहोत. मित्रांनो हे ॲप लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला या ॲप मध्ये सेल्फ सर्वे म्हणजेच स्वयं सर्वेक्षण करायचा आहे.

हे पण वाचा: Solar Eligible Yojana List | सोलार पंप योजना जिल्ह्यानुसार सर्व पात्र लाभार्थी यादी टप्पा 3 डाऊनलोड करा, लगेच यादीत नाव पहा

लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला वरती डाव्या हाताला त्या ॲपमध्ये English आणि मराठी असे दोन पर्याय दिसत असतील तिथे तुम्हाला मराठी पर्यायाला क्लिक करायचा आहे. म्हणजे तुमचे अँप ची भाषा मराठी मध्ये होईल आणि तुम्हाला सर्वे करण्यास अधिक मदत होईल.

Kusum Solar Scheme

तिथे मराठी भाषा निवडल्यानंतर तुम्हाला अर्ज स्थिती या पर्यायावरती क्लिक करायचा आहे. अर्धस्थिती या पर्यावरण क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन ते चार प्रश्न विचारले असतील त्या प्रश्नांची उत्तरे योग्यरीत्या निवडायचे आहे किंवा द्यायचे आहे. ते प्रश्न योग्यरित्या भरल्यानंतर तुम्हाला खाली तीन फोटो काढायचे आहेत. जे की एक नंबरचा फोटो हा तुम्हाला लाभार्थी अर्जदारासोबत सिद्धांत स्त्रोताजवळ उभे करून काढायचा आहे. म्हणजेच जर तुम्ही विहीर वरती फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला अर्जदाराला विहिरीपाशी उभा करून एक फोटो काढायचा आहे.

हे पण वाचा: Kusum Solar Pump Scheme 2023 | तुम्ही किती HP सोलार पंपासाठी पात्र आहात? त्यासाठी जमीन किती व कागदपत्रे कोणती लागतील ?

दुसरा फोटो तुम्हाला सिंचन स्त्रोत याचाच काढायचा आहे म्हणजेच तुमच्या विहिरीचा एक फोटो काढून घ्या. आणि तिसरा फोटो हा तुम्हाला तुमच्या जमिनीचा फोटो काढायचा आहे म्हणजे तुमच्या शेताचा फोटो काढून घ्यायचा आहे. हे सर्व फोटो काढल्यानंतर तुम्हाला खाली सिग्नेर म्हणजेच स्वाक्षरी हा पर्याय दिसत असेल. त्या पर्यायामध्ये तुम्हाला एक पेन्सिलचा बॉक्स दिसत असेल त्या पेन्सिल वरती क्लिक करून तुम्हाला बोटाने सही करायचे आहे. तीसही पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खाली प्रस्तुत करणे या पर्यावरण क्लिक करून तुमचा सर्वे सबमिट करायचा आहे.

Kusum Solar

सर्वे यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पैसे भरा असा पर्याय दिसत असेल. तर तुम्ही पैसे भरून तुमचा सोलार पंप लवकरात लवकर तुमच्या सिंचन स्त्रोतावर बसू शकता.

मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायलाही विसरू नका.

Leave a Comment