सौर कृषी पंप योजना ५ लाख शेतकऱ्यांना सौरपंप मिळणार

सौर कृषी पंप आणि विद्युत जोडणीचे काम सुरु होणार

काही शेतकरी बांधवांचे अर्ज मंजूर झाले असून त्यांनी कृषी पंपासाठी भरावा लागणारा स्वहीस्सा देखील भरला आहे.

असे असताना देखील शेतकरी बांधवाना काही भागात अजून सौर कृषी पंप बसवण्यात आलेले नाहीत. कुसुम सोलार या योजने अंतर्गत शेतकरी बांधवाना सौर कृषी पंप शासकीय अनुदानावर दिले जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवानी कुसुम सोलार या योजनेसाठी अर्ज केलेले आहे.

सौर कृषी पंप पुरवठा करण्यास हवी तशी गती अजून मिळाली नाही.

सौर कृषी पंप योजना अर्थात ‘कुसुम’ योजनेच्या अ, ब, क मध्ये काम सुरु असून ५ लाख शेतकऱ्यांना सौरपंप देण्याचे धोरण राज्य शासनाने केलेले आहे. महाराष्ट्र शासनाकडून राज्यामध्ये फिडर सोलरायझेशनला गती देण्यात येत आहे. यामळे शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. सौर प्रकल्पासाठी जमीन भाडेपट्टीवर देऊन उत्पन्न मिळवून देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे. या योजनेमुळे शेतकरी बांधवाना फायदा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी सांगितली आहे.

जमीन-धारक शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप आणि विद्युत जोडणी देण्याचे काम प्राधान्याने सुरु करण्यात आले असून, ज्या शेतकरी बांधवानी वीज जोडणीसाठी पैसे भरलेले आहे पण विज जोडणी अद्याप प्रलंबित आहे. अशा पहिल्या टप्प्यातील प्रलंबीत जोडण्या मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी सांगितली.

सौर कृषी पंप प्रक्रियेस मिळणार गती

विदर्भातील शेतकऱ्यांना कृषिपंप मिळण्यास उशीर होत असल्याबाबत सदस्य प्रवीण दटके यांनी प्रश्न उभारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस सांगत होते की केंद्र शासनाने “सुधारित वितरण क्षेत्र योजना- सुधारणा अधिष्ठित आणि निष्पत्ती आधारित योजना (RDSS) हा कार्यक्रम राबवण्याचे जाहीर केलेले आहे. यामुळे अखंडित, दर्जेदार, विश्वसनीय व परवडणारा विज पुरवठा लवकरात लवकर होणार आहे.

(RDSS) या योजनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने ३९ हजार कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. यामुळे संपूर्ण राज्यामध्ये जास्त प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कृषी पंप मिळालेला नाही. त्यांना आता लवकरच कृषी पंप मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच जे शेतकरी बांधव विज जोडणीची प्रतीक्षा करत आहे. त्यांना देखील या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

सौर कृषी पंपाचे शासनाचे उद्दिष्ट किती आहे?

५ लाख शेतकऱ्यांना एवढे सौर कृषी पंप देण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाचे आहे.

राहिलेली प्रलंबित विज जोडणी कधी पूर्ण होईल?

पहिल्या टप्प्यातील अपूर्ण विज जोडणी मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment