ST प्रवासात महिलांना 50% सूट, पण नियम अटी काय? आधी जाणून घ्या.

ST प्रवासात महिलांना 50% सूट, पण नियम अटी काय? आधी जाणून घ्या.

ST: अधिवेशनामध्ये महिलांसाठी मोठी घोषणा झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीची वाट सगळ्या महिला बघत होत्या, काही ठिकाणी तर घोषणेच्या 2 ऱ्या दिवसापासून महिला तिकीट कंडक्टरशी भांडू लागल्या. अखेर 17 मार्चपासून सवलत देण्याचा सरकारकडून जी आर आला आहे. आता महिलांना प्रवासात 50% सवलत मिळाली आहे, मात्र प्रवासासाठी रिझर्वेशन करता येईल का? महिलांसाठी वेगळे तिकीट देणार की सर्वांना सारख असणार? सवलत असलेली बस कशी ओळखायची? एसी बसला सवलत असेल की फक्त नॉन एसी बस?

राज्य सरकार मार्फत महिलांना प्रवासात सूट देण्यात आली असून या योजनेला महिला सन्मान योजनेने संबोधित केले गेले आहे.

सवलतीचे नियम व अटी | ST

ST प्रवासात महिलांना 50% सूट, पण नियम अटी काय? आधी जाणून घ्या.

हे पण वाचा: ST Bus News: आज पासून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, परिपत्रक निर्गमित

सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसमध्ये 50% सूट, आता यामध्ये साधी, मिनी बस (ST), निमआराम म्हणजे एशियाड गाडी, विनावातानुकुलित शयन-आसनी म्हणजे नॉन एसी स्लिपर कोच एसटी बस, आणि शिवशाही, शिवनेरी, शिवाई या तिन्ही साध्या आणि एसी बसमध्ये 50 टक्के सवलत 17 मार्चपासून लागू झाली आहे.

महत्त्वाचा मुद्दा भविष्यात एसटी (ST) महामंडळात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या एस टी बसकरताही ही सवलत लागू असणार आहे. महिलांसाठी सवलत असलेल्या तिकीटाची रंगसंगती वेगळी राहणार आहे. 

प्रवासी भाड्यातील अपघात साहाय्यता निधी आणि एसी बससेवासाठी वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात येणार आहे. म्हणजे तुमचं तिकीट 10 रुपये असेल तर त्यावर तु्म्हाला 5 रुपये सवलत मिळेल आणि त्यावर 2 रूपये कर म्हणजे तुम्हाला 7 रूपये तिकीट काढावे लागणार. या सवलतीत तुम्ही राज्यभर कुठेही जाऊ शकता.

राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी कुठेही जाऊ शकता, पण राज्याबाहेर जायचे असेल तर तुम्हाला तिकीटाचा आहे तो दर द्यावा लागणार आहे.

तुम्ही मुंबईपासून बेळगावला जाण्यासाठी निघालात तर तुम्हाला महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच ही सवलत लागू असेल, तिथून पुढे पूर्ण तिकीट आकारण्यात येईल. शहरी वाहतुकीसाठी महिलांना ही सवलत असणार नाही, म्हणजे तुम्ही ठाणे ते पनवेल, कल्याण ते ठाणे एसटीने प्रवास करत असताल तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही.

यामध्ये महिलांनी पुढच्या तारखांचे आगाऊ आरक्षण केले असेल, तर तुम्हाला परतावा मिळणार नाही. 5 ते 12 वयोगटातील मुलींना यापुर्वी प्रमाणेच 50 टक्के सवलत म्हणजे अर्धे तिकीटदर आकारला जाईल. 75 वर्षांवरील महिलांसाठी अमृत जेष्ठ नागरिक योजना लागू होत असल्यामुळे त्यांना फुकट प्रवास करता येणार आहे. यामध्ये 65 ते 75 वयोगटापर्यंतच्या महिलांना सवलतीचा नियम लागू होणार आहे.

1 thought on “ST प्रवासात महिलांना 50% सूट, पण नियम अटी काय? आधी जाणून घ्या.”

Leave a Comment