Subsidy Scheme | ‘या’ सवलत योजनेअंतर्गत चक्क शून्य टक्के व्याजदरात मिळणार कर्ज, या जिल्ह्याला मिळाले तब्बल 57 कोटी

Subsidy Scheme | कित्येक माणसं धंद्यासाठी किंवा व्यवसायासाठी विविध बँकांचं कर्ज घेत असतात. शेतकरी देखील शेतीसाठी पीक कर्ज (Crop Loan) घेतात. अनेक धनदांडगे उद्योगपती कर्जफेड न करता परदेशात निघून जातात, अशी कित्येक उदाहरणे भारतामध्ये घडलेली आहेत. मात्र शेतीतील उत्पन्नाच्या जोरावर शेतकरी त्या पीक कर्जाची crop loan interest rates नियमित परतफेड करत असतो. या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना आता व्याजदरामध्ये मोठी सवलत मिळणार आहे. यासाठी शासनाने एक योजना चालू केलेली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना असे योजनेचे नाव आहे. (Subsidy Scheme)

काय आहे ही योजना | Subsidy Scheme

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना crop loan interest rates या योजनेमार्फत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेमध्ये अल्पमुदत पीक कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये कर्ज घेतल्यास व्याजदरामध्ये 3 टक्के सवलत मिळत होती. तसेच 1 ते 3 लाख रुपये कर्ज घेतल्यास व्याजदरामध्ये 1 टक्के एवढी crop loan interest rates सवलत मिळत होती. मात्र या सवलतीत आता बदल झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना व्याजदरामध्ये आता अधिक सवलत मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी व ग्रामीण बँकाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

योजनेत झाले असे बदल

नुकतंच महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget) पार पडलेलं आहे. या अधिवेशनामध्ये शिंदे सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले, अनेक घोषणाही केल्या. त्यामधील एक निर्णय या योजनेसंदर्भात आहे. Subsidy Scheme आता डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे 0 टक्के व्याजदराने मिळणार आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून या व्याजदरामध्ये 3 टक्के व केंद्र सरकारकडून 3 टक्के मिळून एकूण 6 टक्के अशी सवलत या योजनेद्वारे मिळणार आहे. शेतकऱ्यांना सदरचे पीक कर्ज हे 0 टक्के व्याजदराने उपलब्ध झाले आहे. crop loan interest rates

या जिल्ह्याला मिळाले तब्बल 57 कोटी

या योजनेचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होत आहे. या योजनेचा पुणे जिल्ह्यामध्ये 2 लाख 88 हजार 917 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या सवलतीचे एकूण 57 कोटी 31 लाख 77 हजार 25 रुपये जमा झालेले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या प्राप्त निधीमधून तसेच शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीमधून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वजमा करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी सांगतली.

Leave a Comment