success story
फरीदाबादमधील एक शेतकरी (success story) आता पारंपरिक शेती सोडून बटाटा, कोबी आणि लिंबूची शेती करून लाखो रुपयाची कमाई करत आहे. आपल्या देशातील ५०% पेक्षा अधिक लोक शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबवत असते, ज्यामध्ये राज्य सरकारही शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत आहे.
पारंपारिक शेतीसोबतच सरकार विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना नगदी पिकासारख्या शेतीसाठीही प्रोत्साहन अनुदान देत आहे. जे की त्यांच्या आर्थिक विकासासाठी सुद्धा उपयुक्त ठरत आहे. या मालिकेत हरियाणाच्या फलोत्पादन विभागाच्या मदतीने फरीदाबाद येथे राहणारा सूरज सिंग आता पारंपरिक शेती सोडून बटाटा, कोबी, लिंबू अशा विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करून लाखोंची कमाई करत आहे.
वर्षभर भाजीपाल्यातून कमाई
हरियाणाच्या फलोत्पादन विभागाच्या सहाय्याने त्यांनी भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली. फलोत्पादन विभागाकडून ते वेळोवेळी भाजीपाल्याची सर्व माहिती मिळवत होते. फलोत्पादन विभागाचे लोक त्यांच्या घरी येऊन शेतातील भाजीपाल्याची माहिती द्यायचे आणि सरकारने सुरू केलेल्या योजनाही समजावून सांगायचे, असे त्यांनी सांगितले.
आर्थिक लाभ (success story)
फलोत्पादन विभागाच्या मदतीनंतर त्यांनी गहू व भातशेती सोडून भाजीपाल्याची लागवड चालू केली. भाजीपाला लागवडीमुळे त्यांच्या घरची आर्थिक समस्याही हळूहळू सुधरायला लागली. फलोत्पादन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी सूरज जेव्हा भात आणि गव्हाची शेती करायचा तेव्हा त्याला सहामाही पैसे मिळत होते. यामध्ये आधी वैशाख आणि दुसरी पावसाळ्यात कमाई होत असायची. मात्र, आता भाजीपाला लागवडीतून पूर्ण उत्पन्न मिळत आहे. भाजीपाला लागवडीमुळे त्यांच्या घरचे आर्थिक प्रश्नही दूर होऊ लागले आहे.
शेतकऱ्यांची सूचना
सूरज सिंह म्हणाले, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडे न वळता वैविध्यपूर्ण शेतीचा अवलंब करा. शेतकऱ्यांनी बटाटा, लिंबू, वांगी, कोबी या भाजीपाल्याची लागवड करा. पारंपारिक शेतीबरोबरच इतर पिके आणि भाजीपाल्याचीही लागवड अवश्य करावी. आपल्या शेतमालाची प्रतवारी, मळणी, वर्गीकरण आणि पॅकिंग करून तुम्ही पीक चांगल्या भावामध्ये विकू शकता, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
IMPORTANT INFORMATION