या कारणामुळे अनेक नागरिकांना वेगवेगळे आजार देखील उद्भवतात. या गैरसोयी वर मात करण्यासाठी केंद्र सरकारने ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी स्वच्छालय बांधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान बंद करण्यात आले असून आता तोच निधी स्वच्छ भारत मिशन मधून गोरगरीब नागरिकांना देण्यात येणार आहे. घनकचरा आणि सांडपाण्याच्या व्यवस्थापन आणि सार्वजनिक शौचालयाच्या घटकांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.