Talathi Bharti २०२३ – ३६२८ पदांच्या तलाठी भरतीला मान्यता – नवीन आदेश प्रकाशित

Talathi Bharti 2023 Latest Update

मिळालेल्या नवीन माहिती नुसार, राज्यात लवकरच मोठी तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ३६२८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. बऱ्याच दिवसापासून उमेदवार या भरतीची वाट बघत होते. गेल्या काही वर्षांपासून तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त झालेल्या आहेत. त्यामुळे एकाच तलाठ्याच्या अंगावर अनेक गावे सोपविण्यात आल्याने यंत्रणेवर ताण पडत होता. तसेच कामांना फार वेळ लागत होता. त्यामुळे या पदांसाठी लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते, ज्या भरतीची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे.

तसेच या भरतीची अंदाजे तारीख किंवा वेळापत्रक लवकरच आम्ही व्हॉट्सॲप ग्रुप वर प्रकाशित करू त्यासाठी तुम्ही आमचा व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा.

Talathi Bharti
जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप

या भरतीमध्ये एकुण ३,११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी यानुसार दोन्ही पदे मिळून एकुण ३,६२८ पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये जिल्ह्यानुसार किती पदांसाठी भरती होणार पहा. पुणे विभागामध्ये ६०२ तलाठी साझे आणि १०० महसूली मंडळे एकूण ७०२ पदासाठी भरती होणार. अमरावती विभागामध्ये १०६ तलाठी साझे आणि १८ महसूली मंडळे एकूण १२४ पदासाठी भरती होणार. नागपूर विभागामध्ये ४७८ तलाठी साझे आणि ८० महसूली मंडळे एकूण ५५८ पदासाठी भरती होणार. औरंगाबाद विभागामध्ये ६८५ तलाठी साझे आणि ११४ महसूली मंडळे एकूण ७९९ पदासाठी भरती होणार. नाशिक विभागामध्ये ६८९ तलाठी साझे आणि ११५ महसूली मंडळे एकूण ८०४ पदासाठी भरती होणार. कोकण विभागामध्ये ५५० तलाठी साझे आणि ९१ महसूली मंडळे एकूण ६४१ पदासाठी भरती होणार आहे.

महसूल विभागा मार्फत (Talathi) ‘तलाठी’ पदासाठी ३६२८ पदांची भरती होणार असल्याचे माहिती समोर आली आहे.  या संदर्भातील एक शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिलेली आहे. पूर्ण माहितीसाठी दिलेला PDF शासन निर्णय डाऊनलोड करा.

मिळालेल्या माहिती पत्रकानुसार नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण, पुणे विभागात ३,६२८  पदांची महा तलाठी भरती लवकरच घेण्यात येणार आहे. राज्यामध्ये तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्याने आणि एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये एक बैठक घेतली. या बैठकीला राज्यातील तलाठ्यांना निमंत्रितही केलं होतं. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तलाठी पदे रिक्त आहेत, अनेक गावांचा अतिरिक्त प्रभार असल्याने जनतेला कामासाठी अडचणी येतात.

Talathi Bharti Eligibility

शैक्षणिक पात्रता काय आहे ?

1) मित्रांनो, तलाठी पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदारांना पदांनुसार पात्रता बारावी आणि ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झाले असणे गरजेचं आहे.

2) अर्जदारांनी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं गरजेच आहे.

3) अर्जदारांना मराठी, हिंदी, आणि इंग्रजी विषयाचे हे बेसिक अभ्यास असणे आवश्यक आहे.

4) अर्जदारांनी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि नियमाचे पालन कराव लागणार आहे.

age limit for Talathi Bharti 2023 ?

तलाठी पदासाठी वयोमर्यादा किती असेल ?

मित्रांनो, तलाठी पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा असल्यास अर्जदाराचे वय 18 ते 40 यादरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच मर्यादा सर्वसाधारण प्रवर्गातील असून इतर प्रवर्गातील उमेदवारांना या वयोमर्यादेमध्ये विश्रांती (Relaxation) देण्यात येणार आहे.

Salary Details Talathi bharti 2023

उमेदवारांना पगार किती मिळणार ?

मित्रांनो, तलाठी पदासाठी जर तुम्ही निवडले गेलात तर तुम्हाला शासन निर्णयाप्रमाणे वेतन हे 5,200 ते 20, 200 रुपये प्रतिमहीना इतक मिळणार आहे.

Maharashtra Talathi Bharti Notification 2023

Organization Name:Maharashtra Revenue and Forest Department (RFD)
Rectt. Notice No.:Mahsul Vibhag Bharti 2023
Total No. of Vacancies:03,628 vacancies
Vacancy Names:Talathi & Mandal Adhikari
Post Category:Group C Category Posts
Pay Scale:Rs. 05,200/- to Rs. 20,200/-
Application Dates:In January 2023
Age Limit:18-38 yrs
Qualification:Graduation Degree
Selection Process:Written Exam, Skill Test & DV
Job Category:State Government Jobs
Job Placement:All Over Maharashtra
Apply Mode:Online mode
Official Website:www.rfd.maharashtra.gov.in

How many posts filled for Talathi Bharti

राज्यभरात 3110 तलाठी तर 511 मंडळ अधिकारी पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबर महिन्यातच नोकरीची जाहिरात निघणार असल्याची माहिती मिळाली होती. राज्यातील तलाठी भरतीचा हा GR महसूल विभागाने काढला. पोलीस भरती लागोपाठ आता तलाठी भरतीचा देखील GR प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तलाठी होण्याचे तरुणांचे स्वप्न आता पूर्ण होणार. गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक जिल्ह्यातील तलाठी पदे भरली गेली नाही. यासाठी नुकताच शासन निर्णय पारित करण्यात आला असून, तलाठी भरती न झाल्याने कामकाजाचा भार वाढत गेला आहे.

Talathi Bharti Recruitment District wise

यामध्ये जिल्ह्यानुसार किती पदांसाठी होणार तलाठी भरती

  • पुणे विभागात एकुण ६०२ तलाठी साझे आणि १०० महसूली मंडळे एवढ्या पदासाठी भरती होणार आहे.
  • अमरावती विभागात एकुण १०६ तलाठी साझे आणि १८ महसूली मंडळे एवढ्या पदासाठी भरती होणार आहे.
  • नागपूर विभागात एकुण ४७८ तलाठी साझे आणि ८० महसूली मंडळे एवढ्या पदासाठी भरती होणार आहे.
  • औरंगाबाद विभागात एकुण ६८५ तलाठी साझे आणि ११४ महसूली एवढ्या पदासाठी भरती होणार आहे.
  • नाशिक विभागात एकुण ६८९ तलाठी साझे आणि ११५ महसूली मंडळे एवढ्या पदासाठी भरती होणार आहे.
  • कोकण विभागात एकुण ५५० तलाठी साझे आणि ९१ महसूली मंडळे एवढ्या पदासाठी भरती होणार आहे.

Maharashtra Talathi Bharti 2023

 Talathi Bharti Vacancy Details 2023 Maharashtra

अ.क्र.महसूल विभागजिल्हातलाठी साझे महसुली साझे
1. पुणे पुणे 331 55
2. सातारा 77 12
3. सांगली 52 09
4. सोलापूर 111 19
5. कोल्हापूर 31 05
 एकूण 602 100 
6. अमरावतीअमरावती34 06
7. अकोला 01
8. यवतमाळ 54 09
9. बुलढाणा 10 02
10. वाशीम 0
 एकूण 106 18 
11. नागपूर् नागपूर 94 16
12. चंद्रपूर 133 23
13. वर्धा50 08
14. गडचिरोली114 19
15. गोंदिया49 08
16. भंडारा 38 06
  एकूण 478 80 
17. औरंगाबादऔरंगाबाद117 19
18. जालना 80 13
19. परभणी76 13
20. हिंगोली61 10
21.  बीड 138 23
22. नांदेड 84 14
23. लातुर् 39 07
24. उस्मानाबाद90 15
 एकूण 685 114 
25. नाशिकनाशिक175 29
26. नंदुरबार0
27. धुळे 166 28
28. जळगाव 146 24
29. अहमदनगर202 34
 एकूण 689 115 
30. कोंकण मुंबई19 4
31.मुंबई उपनगर 31 3
32. पालघर86 16
33. ठाणे 72 10
34. रायगड 140 22
35. रत्नागिरी103 18
36. सिंधुदुर्ग99 18
 एकूण 550 91 
 एकूण 3110 518 

Talathi Bharti

महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते की, या बैठकीला महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी हजर होते.

5 thoughts on “Talathi Bharti २०२३ – ३६२८ पदांच्या तलाठी भरतीला मान्यता – नवीन आदेश प्रकाशित”

Leave a Comment