Talathi Bharti Maharashtra: तलाठी भरती साठी 15 मार्च ला येणार 4000+ पदांची जाहिरात

Talathi Bharti Maharashtra: तलाठी भरतीची आपण सर्वजण वाट पाहत आहोत. अशामध्ये वेगवेगळ्या अपडेट्स आपल्याला मिळत असतात. अधिकृत शासन निर्णयानुसार ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही तलाठी भरतीची जाहिरात शासन निर्णयानुसार जानेवारीच्या महिना संपेपर्यंत येणे अपेक्षित होते. परंतु काही अंतर्गत व शासकीय कामामुळे हे जाहिरात येण्यास उशीर झाला आहे.

तलाठी भरतीसाठी महसूल विभागाकडून वेगवेगळ्या विभागातून 4122 पदांसाठी विवरणपत्र देखील मागवण्यात आले होते. या विवरण पत्रामध्ये लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते. या विवरण पत्रामध्ये 31 डिसेंबर 2020 अखेरपर्यंत रिक्त असलेली 1,012 पदे आणि नवीन 3,110 पदे असे एकूण 4122 पदांसाठी तपशील मागविण्यात आला होता.

शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

विभागानुसार पदसंख्या (Talathi Bharti 2023)

  • नाशिक – 803 जागा
  • औरंगाबाद – 799 जागा
  • कोकण – 641 जागा
  • नागपूर – 550 जागा
  • अमरावती – 124 जागा
  • पुणे – 702 जागा

किमान शैक्षणिक पात्रता

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर उत्तीर्ण असावा, शासन निर्णय मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा (MSCIT) उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

किमान वयोमर्यादा (Talathi Bharti Maharashtra)

१८ वर्षे ते ३८ वर्षे, मागासवर्गीय/खेळाडू-०५ वर्षे सूट, प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त उमेदवार/अपंग – ०७ वर्षे सूट

Talathi Bharti Maharashtra

वेतनश्रेणी

तलाठी संवर्गाची वेतनश्रेणी – 25500 ते 81100 रुपये, मंडळ अधिकाऱ्याची वेतनश्रेणी – 32000 ते 101600 रुपये

तलाठी भरतीसाठी मार्च अखेरपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होण्याची चिन्हे दिसत असून ही जाहिरात मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होऊ शकते. जाहिरात प्रसिद्ध होण्याअगोदर इतर आवश्यक माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment