Todays Weather Update | महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जुलै महिना अखेरीस आला तरीही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे चांगला पाऊस पडलेल्या भागांमध्ये शेतीला वेग आला आहे तर काही भागांमध्ये शेतीची कामे रखडली असल्यामुळे शेतकरी पावसाच्या (Today’s Weather Update) प्रतीक्षेत आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Todays Weather Update – काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
जुलै महिना अखेरीस आला तरीही राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस तुरळक प्रमाणात पडत आहे. मुंबई, ठाणे, नांदेड, यवतमाळ, गोंदिया इत्यादी जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस आहे. तसेच, कोकण आणि घाटमाथ्यांवर सातत्याने पाऊस आहे. नुकताच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तसेच, विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे या भागांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
कोठे पडतोय पाऊस? Todays Weather Update
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सातारा, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्यामुळे यलो अलर्ट जारी केला आहे. मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या नाल्या तुडुंब भरून वाहत आहे. तसेच, गोंदिया-आमगाव महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे येथील नद्या ओसंडून वाहत आहे. त्यामुळे पुलावरुन पाणी वाहत असल्यास नागरिकांनी येथील प्रवास करू नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत केले जात आहे.
शेतकऱ्यांच्या पेरणीला वेग
दरम्यान, नांदेड जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच चांगला पावसाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 60 टक्के शेतकऱ्यांनी पेरणी करून घेतल्या आहेत. तसेच, यवतमाळच्या जिल्ह्यामध्येही रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला असून अनेक बाजार पेठीतील दुकानामध्ये पाणी शिरले आहे. रात्रीच्या सुमारास आर्णी शहरामध्ये सुमारे पाच तास जोरदार पाऊस पडला असल्यामुळे नाले तुडुंब भरून वाहत आहे.