सातबारा व मिळकत पत्रिका वर आता ULPIN बंधनकारक असणार | 7-12 Utara ULPIN in Maharashtra

7-12 Utara ULPIN in Maharashtra

Maharashtra 7/12 Utara ULPIN in – सातबारा, मिळकत पत्रिकांवर आता ‘यू एल पीन’ बंधनकारक केंद्र शासनाच्या आव्हानाला राज्याची मान्यता. राज्यातील सर्व सातबारा उतारे आणि मिळकत पत्रिकांवर यापुढे ‘अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक’ (यूएलपीन नंबर) देण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. ही सूचना केंद्र शासनाने दिली होती.

महसूल व वन विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांनी 30 नोव्हेंबर 2022 रोजी याविषयी शासन निर्णय जारी केला होता. सातबारा, मिळकत पत्रिकांवर आता ‘यूएलपीन’ (युनिफाइड लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर) क्रमांक दर्शविण्यासाठी महसूल यंत्रणेला मान्यता देण्यात आल्याचे यामध्ये नमूद केलेले आहे.

याकरता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे नियम 1971 मधील तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे केंद्राला देखील आता कोणत्याही मालमत्तेचा शोध घेणे सोपे होणार आहे. (712 Utara ULPIN in Maharashtra)

आता 7-12 ULPIN बंधनकारक

ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी सरिता नरके म्हंटल्या आहेत, केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यांना महसूल दस्तऐवज जतन व वापर करण्याची पद्धत सुटसुटीत व संगणकीय करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मालमत्तेशी संबंधित दस्तऐवजांवर यूएलपीन वापरण्याची सूचना संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारताला करण्यात आली होती. त्यामुळे सर्व राज्यांमधील दस्तऐवजांचे सूत्रीकरण होण्यास मदत होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर केंद्राने यूएलपीनबाबत देशभर सूचना दिल्या आहे.

यादरम्यान, शासनाने यूएलपीन क्रमांक देण्याच्या निर्णयानंतर देखील सातबारा आणि मिळकत उताऱ्यांवरील आधीचे क्रमांक कायम राहणार असून. “राज्यात आधीपासून गावनिहाय दस्तऐवज जतन केलेले आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील महसुली दफ्तरांमध्ये पहिल्या क्रमांकापासून सुरुवात केली जात असते. मात्र आता यूएलपीन येणार असल्यामुळे देशातील सर्व मालमत्ता दस्तावर स्वतंत्र क्रमांक येतील व त्याची ओळख तत्काळ पटवणेही अगदी सोपे होणार आहे, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. 7-12 Utara ULPIN in Maharashtra

असे होणार 7-12 उताऱ्यावरील बदल

  • गट क्रमांक व उपविभागाच्या उल्लेखाआधी आता यूएलपीन क्रमांक टाकला जाणार.
  • यूएलपीन संबंधीचा स्कॅन केला जाणारा क्यूआर कोड आता गाव नमुना क्रमांक सातबारा उताऱ्यावर उजवीकडील कोपऱ्यात असणार आहे. तेथे यूएलपीन क्रमांकदेखील दिला जाणार आहे.
  • पत्रिकेच्या मध्यभागी महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह असणार आहे.
  • पत्रिकेवरील पहिल्या ओळीच्या वरील डाव्या बाजूला यूएलपीन क्रमांक दिला जाणार आहे.
  • यूएलपी संबंधीचा स्कॅन केला जाणारा क्यूआर कोड आता पत्रिकेच्या दर्शनी भागात उजवीकडील कोपऱ्यात असणार आहे. तेथे यूएलपीन क्रमांकदेखील दिला जाणार आहे.

Leave a Comment