Weather: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाका तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. त्यातच राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र होऊ लागल्यामुळे तापमानात घट कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. अशातच हवामान विभागाने या आठवड्यासाठी एक महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे.
अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच विदर्भात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची तीव्रता अधिक राहून गारपीटीची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. तसेच या आठवड्यामध्ये विदर्भात नागपूरसह बऱ्याच राज्यांमध्ये वातावरणाची स्थिती कायम राहणार आहे.
हे पण वाचा: Free Flour Mill Yojana Maharashtra: मोफत पीठ गिरणी योजना महाराष्ट्र येथे अर्ज करा
Weather
यामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा बसण्याची दाट शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यास पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.