Kusum Solar Pump Yojana 2023: शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी मित्र विचार करत असेल की किती एचपीचा सोलर पंप मिळणार आहे किंवा किती क्षेत्र असलेल्या धारकांचा किती एचपीचा Kusum Solar Pump मिळतो किंवा हे कसे पात्रता ठरवतात. कोणत्या शेतकऱ्याला किती एचपीचा पंप दिला जावा याबाबत आपण आज माहिती जाणून घेऊ. सध्या सौर उर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. केंद्र /राज्य सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना ची अंमलबजावणी केलेली आहे.
Kusum Solar Pump Scheme 2023
यामध्ये सौर ऊर्जा वापरायला अनुदान (Subsidy) मिळावे यासाठी अनुदान स्वरूपात शासनाकडून अनुदान देण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे. केंद्राकडून प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप ही योजना आणि राज्य शासनाचे मुख्यमंत्री शाश्वत सौर कृषी पंप योजना महाराष्ट्रा राज्यामध्ये राबवण्यात येत आहे. पंतप्रधान कुसुम योजनेचा विचार केला (Pm Kusum Solar Pump Scheme) या योजनेत शेतामध्ये सोलर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना 90 ते ९५% पर्यंत अनुदान दिले जाते.
कुसुम सोलर पंप योजना
प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचे महत्त्वाचे माहिती पाहूया. शेतकऱ्यांना जमीन धारण क्षमतेनुसार 3, 5, आणि 7.5 एचपीचे पंप हे शेतकऱ्यांना अनुदानावर दिले जातात आणि त्यापेक्षा जास्त अस्वशक्ती डीसी सर्व पंप देखील उपलब्ध होणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचे कृषी पंपाच्या किंमतीच्या 10% व अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% यामध्ये भरणा भरावा लागतो. म्हणजे 5% आणि 10% लाभार्थी हिस्सा स्वतः शेतकऱ्यांना भरावा लागतो. उर्वरित 90% आणि 95% रक्कम शासन भरत असते.
सोलर पंप लाभार्थ्यांची निवडीचे निकष?
शेततळे, विहीर, बोरवेल, 12 महीने वाहणारी नदी, किंवा नाला, यांच्या शेजारील शेत पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी त्याचबरोबर अट्टल सौर कृषी पंप योजनेचा टप्पा 1,2, किंवा मुख्यमंत्री सौर कृषी योजने अंतर्गत अर्ज केलेले परंतु अर्ज मंजूर न झालेले अर्जदार यासाठी देखील पात्र ठरतात. त्याचबरोबर शेतातील पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी योजनेसाठी पात्र असतील
किती जमीन धारकास किती एचपीचा पंप मिळतो?
3 एचपीचा सोलर कृषी पंप इन्स्टॉल करायचं असेल, तर तुमच्याकडे 100 गुंठे जमीन म्हणजे २.५ एकर शेत जमीन असणे आवश्यक आहे. २.५ एकर शेत जमीन असेल तर 3HP चा सोलर पंप मिळतो. 5 एकर जमीन असल्यास 5HP सोलर पंप मिळतो. त्यास अनुदान पात्र ठरतो. 5 एकर पेक्षा जास्त जमीन असल्यास 7.5HP (Solar pump Scheme) त्यापेक्षा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जातात. या संदर्भातील अधिक सविस्तर माहिती खाली दिलेली आहे, तिथं पाहू शकता.
सोलर पम्प कि ऑनलाइन होगई थी पन अबतक नंबर लगा नहीं आया नहीं मेसेज आया ld,mk100s193437 pass,5060 youse no,78
I require 7.5hp pump
आम्हाला पण हवा आहे.आमचा पण एक अर्ज. करा
S