Maharashtra Budget 2023: यावर्षी राज्याचा अर्थसंकल्प हा अमृतकाळातील पहिलाच अर्थसंकल्प आहे. तो ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Farmers Honor Fund) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे.
Maharashtra Budget 2023: राज्यातील शेतकऱ्यांना आता १ रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आणि उर्वरित रक्कम राज्य सरकारकडून भरण्यात येणार.
अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित | Maharashtra Budget 2023
1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
5) पर्यावरणपूरक विकास
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा
-छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आहे. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये उपलब्ध करून दिला आहे.
– आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी निधी
– मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये निधी
– शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये निधी
केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजना या योजनेत आणखी सहा हजार रुपयांची भर केंद्र सरकार घालणार आहे. त्यामुळे शतकऱ्यांना वर्षाकाठी 12000 रुपये मिळणार आहेत.
- प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
- प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
- केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
- 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
- 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार