ST Bus News: आज पासून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, परिपत्रक निर्गमित

ST Bus News: एसटी महामंडळाच्या सर्व बसने प्रवास करणाऱ्या महिलांना अर्ध्या तिकिटावर राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी एप्रिलपासून होणार आहे.

योजनेमुळे सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम राज्य सरकारकडून महामंडळाला मिळेल. त्यामधून उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक अडचणीतील लालपरीला नवसंजीवनी मिळणार आहे.

एसटी (ST) महामंडळातर्फे समाजातील विविध ३० घटकांना प्रवास भाड्यात ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते.

आता राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सुविधा दिलेली आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ६ कोटी ज्येष्ठ प्रवाशांनी घेतलेला आहे.

हे पण वाचा: PM Svanidhi Yojana: अडीच हजार लाभार्थ्यांना कर्जवाटप; तिसऱ्या टप्प्यातील कर्जासाठी अर्ज करा

आता दररोज सरासरी ५ लाखापेक्षा जास्त अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक एसटीतून मोफत प्रवास करत आहेत. प्रती महीना (Monthly) ६५ ते ७० कोटी रुपये मिळतात. | ST Bus News

सध्या एसटीने दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करत आहेत आणि विविध योजनांमुळे महामंडळाला दिवसाला (प्रतिपूर्ती रक्कमेसह) २२ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

त्यामधून अडचणीतील लालपरीचा प्रवास चालू आहे. आता राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार परिपत्रक निघाल्यानंतर महिलांना प्रवास दरामध्ये ५० टक्क्यांची सवलत लागू होईल. त्याचाही मोठा आधार लालपरीला मिळणार आहे.

लालपरीची सद्यःस्थिती | ST Bus News

  • सध्या दररोज सरासरी ५०-५५ लाख प्रवासी करतात लालपरीतून प्रवास
  • एकूण प्रवाशांमध्ये अंदाजे ३० टक्के म्हणजेच १६ ते १७ लाख महिला प्रवासी
  • १२ वर्षाखालील मुलींना आणि ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत
  • राज्यातील ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना प्रवासात १०० टक्के सवलत
  • महामंडळाचा दरमहा सरासरी खर्च ८५० कोटी व उत्पन्न ७२० कोटींपर्यंत आहे

नोकरदार व माहेरवासिनींना लालपरीचा आधार

Leave a Comment