Farm loans | नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि भांडवल उभारण्यासाठी कर्जाची आवश्यकता असते. मात्र कर्ज देण्याआधी बँका सिबिल स्कोरसोबतच अनेक घटक तपासत असतात. त्यासाठी व्यावसायिकाला आधी बँकांना रिपोर्ट द्यावा लागतो. त्या रिपोर्टमध्ये व्यावसायिक क्षेत्रातील अनुभव, उत्पादनाची माहिती आणि उत्पादनाची निवडीची कारणे, मार्केटिंगच्या योजना, कर्जाचा हेतू, महसूल मॉडेल, नफा वगैरे मुद्द्यांचा समावेश असावा.
सिबिल स्कोअर काय असावा | Farm loans
विविध वित्तीय संस्था आणि बँका कर्ज देण्याआधी सिबील स्कोअर तपासतात. सिबिल म्हणजेच Credit Information Bureau of India limited. सिबिल स्कोअर हा तीन अंकी डिजिट नंबर असतो जो आपल्या क्रेडिट कार्डची हिस्टरी दाखवतो. जर तुम्ही कर्जाची (Loan) परतफेड किंवा क्रेडिट कार्ड (Credit Card) पेमेंट योग्य वेळेत करत असाल तर सिबिल स्कोअर चांगला असतो. सिबिल स्कोअर जितका जास्त असेल तितकी कर्ज मंजुर होण्याची शक्यता वाढते. सिबिल स्कोअर हा 300 ते 900 पॉईंट्सच्या दरम्यान असतो. 750 पेक्षा अधिक पॉईंट्स चांगला स्कोअर म्हणून ओळखला जातो. सिबिल स्कोअर जर 750 हून अधिक असेल तर अशा कर्जदारांना सर्वोत्कृष्ट व्याजदरांसह कर्ज आणि क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन दिले जाते.
कर्जदाराची विश्वासार्हता | Farm loans
कर्जदारची कर्ज परतफेडीची क्षमता बँका तपासतात. अर्ज करताना कर्जदार कर्जाची परतफेड कशी करणार यावर बँका आधिक लक्ष देतात. कर्ज देताना बँका आणखी एक बाब लक्षात घेतात ती म्हणजे भविष्यात जर व्यावसायिकाला आर्थिक अडचणी आल्या तर कर्जाच्या परतफेडीस कोणते पर्याय उपलब्ध आहेत. योग्य आर्थिक अंदाजानुसार चांगल्या बजेटमध्ये आकस्मिक निधीचा समावेश केलेला असेल तर बँकांना कर्ज देताना कर्जदाराबद्दल अधिक विश्वास वाटतो.
सिबिल स्कोअर खराब असेल तर..
जर सिबिल स्कोअर कमी असेल तर काय करायचं याची चिंताही काही जणांना असते. तुमचे उत्पन्न चांगले असल्यास तुम्ही संयुक्त कर्जाची निवड करू शकता किंवा सिबील स्कोअर कमी असल्यास एखाद्याला जामीनदारही बनवू शकता. तुमच्या संयुक्त कर्ज धारकाचा किंवा जामीनदाराचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर सहज कर्ज मिळू शकतं. जर सह-अर्जदार महिला असेल तर तुम्हाला व्याजदरातही काही फायदा मिळू शकतो.