MNREGA | या शेतकऱ्यांना मिळणार ४ लाखांचे अनुदान ! मनरेगा सिंचन योजनेतील शेतकऱ्यांची यादी जाहीर

MNREGA | महाराष्ट्रात शिंदे व फडणवीस सरकारने मनरेगा सिंचन योजनेमार्फत नवीन घोषणा केली होती. यानुसार मागेल त्याला विहरीसाठी 4 लाखांचे अनुदान दिले जाणार होते. तसेच या योजनेतील काही अटी शिथिल केल्याचे पत्रक देखील जाहीर केले होते. दरम्यान राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. (Subcidy for Well)

पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी या सिंचन योजनेकरिता अर्ज केले होते. त्यांची पात्र लाभार्थी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. (List of farmers) यामध्ये कोणते अर्ज मंजूर झाले आहे ? कोणाला किती अनुदान मिळाणार ? याबाबत सर्व माहिती दिलेली आहे. ही माहिती कशी पहायची याबाबत महिती पाहुयात.

MNREGA अशी पहा यादी | Subcidy for Well

१) सर्वात आधी मनरेगाच्या nrega.nic.in या अधिकृत साईटवर या.
२) त्यानंतर ग्रामपंचायत वर जाऊन generate report या पर्यायावर क्लिक करा.
३) याठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र राज्य, वर्ष, जिल्हा, तालुका व गाव निवडा.
४) यानंतर proceed वर क्लिक करा.
५) याठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचा Dashboard (डॅशबोर्ड) दिसेल. यामध्ये तुमच्या गावात सुरू असणारी सर्व प्रकारची कामे पाहायला मिळतील.
६) येथे work status पर्यायावर क्लिक करा.
७) येथे Finantial year पर्याय निवडा.
८) येथे कामाची लिस्ट दिसेल. यामध्ये वैयक्तिक काम पर्याय निवडा
९) याठिकाणी तुम्हाला चालू आर्थिक वर्षातील वैयक्तिक कामे पाहायला मिळतील. यामध्ये मनरेगा सिंचन योजनेमार्फत मागेल त्याला विहीर अनुदान योजनेतून मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहायला मिळेल.

MNREGA: या शेतकऱ्यांना किती लाखांचे Subcidy for Well अनुदान मिळणार आहे. ही माहिती सुद्धा याठिकाणी उपलब्ध होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चालू आर्थिक वर्षाव्यतिरिक्त मागील वर्षातील माहिती देखील याठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यासाठी फक्त आर्थिक वर्ष निवडावे लागेल. तसेच इतर योजनांची माहिती सुद्धा तुम्ही याठिकाणी पाहू शकता.

Leave a Comment