Mahindra launched world’s fastest car
Mahindra launched world’s fastest car: महिंद्रा अँड महिंद्राने एक कार लॉन्च केली आहे. ही कार जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रीक कार आहे. या कारचे हक्क महिंद्रांची मालकी असलेल्या पिनिनफेरिना या ऑटोमोबाइल कंपनीकडे आहे. या कारचं नाव बटिस्ता असं आहे. या हायपर कार बटिस्ताची किंमत 18 कोटी रुपये इतकी आहे. ही कार जितक्या वेगाने धावते अगदी तेवढ्याच क्षणात ही कार जागेवर थांबते. विशेष म्हणजे ही कार फोर व्हील ड्राइव्ह कार आहे. म्हणजेच या गाडीची चारही चाकं एकाच वेळेस फिरवता येतात.
Mahindra launched world’s fastest car
पिनिनफेरिना बटिस्ता कार 350
किमी प्रती तास या टॉप स्पीडवर धावते. या इलेक्ट्रीक गाडीचा विचार केल्यास हा वेग सामान्य इलेक्ट्रीक गाड्यांच्या वेगापेक्षा अनेक पटींनी अधिक आहे. या गाडीची बॅटरी पॅक क्षमता 120 kWh इतकी आहे. या बॅटरीमध्ये 6960 लिथियम-आयन सेल आहे. गाडीचं एकूण वजन जवळपास 2 टन इतकं आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यास 482 किमीची रेंज देते. या गाडीमध्ये बेस्पोक चेसिस आणि सस्पेन्शन ट्यूनिंग आहे. म्हणजेच खराब रस्त्यावरही ही गाडी सहज चालवता येते. पिनिनफेरिना बटिस्ता कार केवळ 1.86 सेकंदांमध्ये 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते. तर 4.75 सेकंदांमध्ये 0 ते 200 किमी वेगाने धावू शकते.