Subsidy | अतिवृष्टीमुळे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेतीतील (Agriculture) पिकाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे (Crop Subsidy) शेतकरी अनेक दिवसांपासून अतिवृष्टी भरपाईच्या प्रतीक्षेत होते. आता याच शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग (Deposit) करण्यात आली आहे. तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अतिवृष्टीची (Crop Subsidy) भरपाई रक्कम जमा करण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वितरण? (Subsidy)
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे (Crop Subsidy) जास्त प्रमाणात नुकसान झाले होते. याच अतिवृष्टी नुकसानग्रस्त परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मदतीची भरपाई रक्कम खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Finance) दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकऱ्यांना याआधी वाढीव दराने मदतीचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कधीपर्यंत झाले निधीचे वितरण?
मित्रांनो, अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, पाथरी, पूर्णा तालुक्यांतील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना या अनुदानाचे वितरण चालू आहे. त्याचवेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत या अनुदानाचे वितरण शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत जमा करण्यात आलेले आहे. याविषयी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत देण्यात आली आहे.
किती निधी झाला खात्यावर जमा?
शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान रक्कम परभणी जिल्ह्यातील चार तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. तर 66 हजार 82 शेतकऱ्यांच्या खात्यावर 58 कोटी 38 लाख रुपये एवढे अनुदान जमा करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दरात मदतीचे वितरण करण्याचा निर्णय डिसेंबर महिन्यात घेण्यात आला होता. याकरता 76 कोटी 39 लाख 80 हजार रुपये निधी डिसेंबर महिन्यात मंजूर करण्यात आला होता.
किती केले तालुकानिहाय अनुदान वितरण?
तालुका – शेतकरी संख्या – वितरित रक्कम
- परभणी- 24671 – 27.94
- सेलू – 5009 – 3.19
- पाथरी- 12491 – 8.53
- पूर्णा – 24911 – 18.70
अकोला जिल्ह्याची माहीती कळवा…
कृपया सोलर साठी माहिती पाठवा
महाराष्ट्रातील एकूण तालुके किती
आपली मोठी बातमी दाखविणे चार तालुके
हे लोकांना खरे वाटेल का
सरकारी बातम्या वेगळ्या आहेत
वास्तव द्या बातम्यात