PM Kisan 13th Installment | बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा 13वा हप्ता जमा, त्वरित तपासा तुम्हाला मिळाला का?

PM Kisan 13th Installment | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan 13th installment) 13 वा हप्ता जमा करण्यात आला आहे. कर्नाटकातील बेलगावी येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 16,800 कोटी रुपये हस्तांतर केले आहेत. या योजनेचा थेट 8 कोटी 2 लाख पात्र शेतकऱ्यांना (PM Kisan 13th installment) मिळाला आहे. या सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बॉम्बे, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हजर होते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना एका वर्षात 6,000 रुपये दिले जातात. वर्षभरात प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमधून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. पीएम किसानचा 12 वा हप्ता ऑक्टोबर 2022 मध्ये मंजूर झाला होता. तर 11 वा हप्ता मे 2022 या महिन्यात देण्यात आला होता.

8 कोटींहून जास्त शेतकर्‍यांना 12 व्या हप्त्याचे पैसे मिळाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये शिमला, हिमाचल येथे आयोजित एका कार्यक्रमात PM किसानचा 12 वा हप्ता मंजूर केला होता. 12 वा हप्ता देखील देशातील 8 कोटींहून जास्त शेतकऱ्यांना मिळाला आहे. त्याच वेळी, 11 वा हप्ता 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळाला होता. 12 वा हप्ता कमी मिळाल्याचे कारण असे की अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी (e-kyc) न करणे आणि सरकारने केलेल्या तपासणीत अपात्र लाभार्थी आढळून येणे.

त्वरित तपासा लाभार्थ्यांची यादी (PM Kisan 13th Installment)

शेतकरी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत (PM Kisan Beneficiary List) त्यांचे नाव ऑनलाइन पाहू शकतात. यासाठी त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही, नाव तपासण्याचा हा मार्ग वापरा.

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
  • Farmers Corner या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन पेज उघडेल.
  • येथे लाभार्थी यादी पर्याय निवडा.
  • एक फॉर्म उघडेल. यामध्ये राज्य, नंतर जिल्ह्याचे नाव, ब्लॉक आणि गाव निवडा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर get report या पर्यायावर क्लिक करा.
  • असे केल्यावर तुमच्या गावातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तुमच्यासमोर दिसेल.

Leave a Comment