फळबाग लागवड योजना; अनुदानासह शेकऱ्यांना मिळणार मोफत रोपे

जॉईन व्हॉट्सॲप ग्रूप

Agriculture Scheme : भारतामध्ये शेती व्यवसायाला मजबूत करण्याकरिता केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून विविध प्रकारच्या कृषी योजना राबविल्या जातात. बिहारमधील सरकार सुद्धा शेतीच्या विविध योजना राबवत आहे. फळबाग लागवडीला चालना देण्यासाठी बिहार सरकारने एक नवीन योजना आणली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबाग लागवडीवरील खर्चामध्ये मोठी बचत होणार आहे. फळबाग लागवड योजना प्रोत्साहान देण्यासाठी बिहारचे सरकार आता शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी मोफत रोपांचा पुरवठा करणार आहे. याशिवाय फळबाग लागवडीसाठी अनुदान देखील देण्याचा निर्णय बिहारच्या सरकारने घेतला आहे.

देशात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश यासोबतच महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी फळबाग लागवड करतात. फळबाग उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देखील मिळते. परंतु फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन खर्च सुद्धा करावा लागतो. केंद्र आणि राज्य सरकारद्वारे चालविल्या जाणाऱ्या योजनांचा अनेक शेतकरी लाभ घेतात. बिहार सरकारनेही फळबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मोफत रोपे देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

फळबाग लागवड योजना

या सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या फळबाग योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ऑनलाईन पद्छतीने अर्ज करू शकतात. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार लाभार्थ्यांची निवड केली जाईल. यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या साईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी बिहार सरकारने ५०% अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला असून, या योजनेंमार्फत शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपये ३ हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहेत. पहिल्या वर्षी, ६०% अनुदान दिले जाईल, जे ३०,००० रुपयांपर्यंत असेल. एक हेक्टरमध्ये ४०० रोपे लावण्यासाठी जवळपास २०,००० रुपये खर्च येतो. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाणार आहे. दुसऱ्या वर्षी १०,००० आणि तिसऱ्या वर्षीही १०,००० रुपये असे तीन हप्त्यामध्ये ५०,००० रुपये अनुदान दिले जाणार आहे. | फळबाग लागवड योजना

Leave a Comment