चंदन ही एक अशी (Farming) वनस्पती आहे जी शेतकऱ्यांना हलक्या जमिनीत आणि कमी पाण्यात भरपूर संपत्ती कमवून देऊ शकते. ‘पुष्पा’ या चित्रपटात तुम्ही हे पाहिले असेलच आणि त्याची किंमत तुम्हाला माहीत असेलच. तर आज आपण त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत.
आपल्याकडे चंदनाची लागवड (Farming) फारच कमी प्रमाणात लागवड केली जाते. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात काही ठिकाणी चंदनाची लागवड आहे. चंदनाची लागवड केल्यास एक एकरात काही कोटी रुपये सुद्धा मिळू शकतात. या व्यवसायातून तुम्ही सहजपणे लाखो रुपयाची कमाई करू शकता.
चंदनाला फक्त भारतामध्येच नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही (International Market) त्याची फार जास्त प्रमाणात खरेदी केली जाते. चंदनाच्या (Farming) झाडाला खूप मागणी देखील आहे. याचा मुख्य उपयोग परफ्यूमसाठी केला जातो. चंदन हे द्रव स्वरूपात तयार केले जात असते.
चंदनापासून (Farming) लाखो रुपयांची कमाई करणे अपरिहार्य आहे कारण हे लाकूड बाजारात सर्वात महाग विकले जाते. मार्केट मध्ये 1 किलो चंदनाची किंमत 26 ते 30000 रुपये आहे. जर तुम्ही झाड लावले आणि त्यातून 15 ते 20 किलो लाकूड मिळवले तर तुम्हाला 5 ते 6 लाख रुपये सहजपणे मिळतील. मात्र, सध्या सरकारने चंदनाच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली असल्याने सरकार त्याची खरेदी करत आहे.
हे रोप तुम्हाला 100 ते 130 रुपयांना मिळते. त्या वेळी, त्याला जोडलेल्या होस्ट प्लांट ची किंमत सुमारे 50 ते 60 रुपये एवढी आहे. चंदनाच्या झाडाला लागवडीनंतर ७ ते ८ वर्ष कोणत्याही बाह्य संरक्षणाची आवश्यकता नसते, कारण त्याला कोणताही सुगंध येत नाही.
त्याचे लाकूड परिपक्व झाले की लगेच वास यायला लागतो. यासाठी तुम्ही तुमच्या शेताची सुरक्षा आणि निगराणी मध्ये वाढ करावी. चंदनाचे झाड तुम्ही केव्हाही लावू शकता, परंतु लागवड करताना हे लक्षात ठेवा की ते झाड 2 ते 2.5 वर्षे जुने असले पाहिजे, त्यावेळी ते खराब होण्याची शक्यता नगण्य प्रमाणात असते.
चंदनाची लागवड (Farming) करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. चंदनाला कमी पाणी लागते. लागवड करताना सखल भागात लागवड होणार नाही याची दक्षता घ्या. ही वनस्पती परोपजीवी वनस्पती आहे, त्याच्यासोबत यजमान वनस्पतीची लागवड करणे गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हंटले तर, ही वनस्पती एकट्याने लावता येत नाही आणि एकटी जगू शकत नाही.
चंदन ही वनस्पती मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे. पांढरे चंदन आणि रक्तपिपासू दोन्ही झाडे वेगवेगळ्या प्रजातींची आहेत हे लक्षात ठेवा. वालुकामय माती सोडता सर्व प्रकारच्या जमिनीत चंदन वाढू शकते. हे उत्तम निचरा होणारी डोंगराळ जमीन, काळी माती, बारीक गाळ आणि नदीच्या जमिनीत चांगले वाढते. चंदनाचे झाड काहीसे परोपजीवी असल्याने त्याच्या वाढीसाठी त्याला साथीदार रोपाची गरज असते. शिरस, धवडा, बाभूळ, तेतू, बोर, शिशू, गिरीपुष्का, कडुनिंब, करंज इत्यादी झाडांच्या समूहात नैसर्गिक जंगलात चंदन वाढते.
4 बाय 4 मीटर अंतरावर झाडे लावा. चंदनाला साथीदार झाड लागत असल्याने दोन चंदनाच्या झाडांच्या मध्ये एक वेगळे झाड लावावे. जेणेकरून त्याला कायमचा आधार मिळण्यास मदत होईल. त्यासाठी सूर, माळीयाम, पेरू, कारवंद, कडुनिंब, जांभूळ, डाळिंब, मेल्या डुबिया यापैकी झाडे लावावे. सुरुवातीच्या टप्प्यात चंदनाच्या झाडाच्या अवती-भोवती ५ ते १० तुरीची रोपे लावा. कमीतकमी 3 वर्षे चांगली काळजी घ्या. रोपांना पुरेशा प्रमाणात खत आणि पाणी दिल्याने झाडांची भरपूर प्रमाणात वाढ होते.
व्यावसायिक कापणीचा कालावधी 15 वर्षे एवढा आहे. चंदनाच्या झाड कापणीसाठी विभागीय वन अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागत असते. लागवडीनंतर सात मातीच्या नमुन्यांमध्ये त्याची नोंद करावी लागते. लागवड करण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला नकी घ्या. 4 बाय 4 मीटर अंतरावर चंदनाची रोपे लावावीत. चंदनाला साथीदाराची गरज असल्याने दोन चंदनाच्या झाडांच्या मध्ये एक झाडाची प्रजाती लावा.
चंदनाची लागवड करताना Farming
खाजगी जमिनीत चंदनाची लागवड करण्यासाठी परवानगी भेटत नाही. पण, जंगलतोड करण्यासाठी विभागीय वन अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. चंदन ही संरक्षित वन प्रजाती पैकी एक प्रजाती आहे. त्याची काढणी आणि विक्रीसाठी वन संवर्धन कायदा, 1956 अंतर्गत पुरवठा परवानगी आवश्यक असते. आपल्या शेतीमधील संबंधित वन अधिकाऱ्याकडून चंदन लागवडीचे प्रमाणपत्र मिळवा.
अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- झाड कापण्याचा नमुना क्रमांक १
- सात बारा शेतीयोग्य जमीन
- 8 अ. लागवडीयोग्य जमीन
- लागवडीयोग्य जमिनीचा नकाशा
- लागवडीयोग्य जमिनीची मर्यादा
- 12 हेक्टरपेक्षा कमी जमिनीचा दाखला
- नॉन-प्रगत आणि नॉन-प्रगत गटाचे प्रमाणपत्र
- पुनर्लावणीसाठी हमीपत्र (रु. 100 बॉड पेपर वर )
Farming
आपल्या देशामध्ये चंदनाची लागवड फार कमी ठिकाणी व कमी प्रमाणात करण्यात येते. चंदनाचे झाड लावण्यासाठी कमीतकमी पाच लाख रुपये एवढा खर्च येतो. महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये चंदन लागवडीचे प्रयोग देखील करण्यात आलेले आहेत.
चंदनाच्या झाडाची किंमत किती आहे? Farming
चंदनाची झाडे खूप महाग विकले जातात. एका रोपासाठी जवळपास ५०० ते ६०० रुपये आकारले जातात. चंदन लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार देखील खूप प्रयत्नशील आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटकात चंदनाची शेती जास्त प्रमाणामध्ये लागवड होते. महाराष्ट्रात चंदनाच्या बिया कर्नाटकातून येतात. मात्र, आता महाराष्ट्रातही उपलब्ध झाले आहेत.
लाल आणि पांढरे चंदन (Farming)
चंदनाचे झाड हळूहळू परिपक्व होत असते. चंदनाचे झाड जसजसे परिपक्व होते तसतसा त्याचा सुगंध जास्त प्रमाणात वाढत असतो. चंदन जितके जास्त ठेवाल तितके वजन वाढत जाते. चंदन वनस्पतीचे दोन प्रकार आहेत, एक पांढरे चंदन आणि दुसरे लाल चंदन. हरियाणा, पंजाब, उत्तर या राज्यात पांढर्या चंदनाची लागवड केली जाते. चंदन 5 ते 47 डिग्री सेल्सियस तापमानात जास्त वाढते.