Government Scheme: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १४ वा हप्ता मे महिन्यात येण्याची शक्यता वाटत आहे. याचा लाभ कोणाला मिळणार याबाबत माहिती पाहूया.
शासनाकडून लोकांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांचा Government Scheme लाभ कसा घ्यायचा हे लोकांपर्यंत पोहचले पाहिजे याची जबाबदारीही सरकारची आहे. या योजनेत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचाही समावेश आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये जमा केले जातात.
परंतु, एका कुटुंबातील किती व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळतो, हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी सरकारने स्पष्ट माहिती सांगतली आहे. (PM kisan yojana)
या योजनेंतर्गत सरकार अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना वार्षिक 6,000 रुपये देणार आहे. याअंतर्गत हे 6,000 रुपये एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात.
Government Scheme
किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना दिला जात आहे. या कुटुंबात पती, पत्नी व त्यांची मुले या योजनेमध्ये ठेवण्यात आली आहे. यामध्ये पती-पत्नी दोघांनाही स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ मिळावा, असा कोणताही नियम यामध्ये नाही.
या योजनेशी संबंधित 3 हप्त्यांचे पैसे एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या कालावधीत केव्हाही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात. आता सरकारच्या पीएम किसान योजने-मार्फत १४ वा हप्ता या मे महिन्यात येण्याची शक्यता वाटत आहे.
pmkisan.gov.in या साईट वर जाऊन शेतकरी या १४ व्या हप्त्याची स्थिती बघू शकतात. या लिंकवर जाऊन लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करून पुढील हप्त्याचे अपडेट जाणून घेता येते.