अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे नऊ एप्रिल रोजी वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसहश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (ता. 11 एप्रिल) पाहणी केली. नुकसान झालेले कोणतेही शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहणार नाही, याकरिता युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येणार आहेत. त्यानंतर एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वितरित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे व राहील. सलग 5 दिवस 10 मिलीमीटर पर्यंत पडणारा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून समजण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतलेला आहे. दरम्यान तातडीने पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने करावे. कांदा पिकांची 7/12 वरती नोंद नसली, तरी पंचनाम्यात नोंद घेऊन नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिलेल्या आहे.