Incentive Grant: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 50 हजारांच्या अनुदानाची चौथी यादी जाहीर, लगेच यादीत नाव पहा

Incentive Grant | नियमित कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची खुशखबर समोर आली आहे. ‘महात्मा फुले कर्जमुक्ती योजने’अंतर्गत आपल्या निमित्ताने आपल्या पीक कर्जाची (Incentive Grant) नियमितपणे कर्जमाफी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना चक्क 50 हजार (incentive Grant) रुपयांचे अनुदान देण्यात येत आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या यापूर्वी 3 याद्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या. आता उर्वरित शेतकऱ्यांसाठी ही बातमी फायद्याची आहे.

प्रोत्साहन अनुदानाची चौथी यादी प्रकाशित | Incentive Grant

प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या तीन याद्या याआधीच प्रकाशित झालेल्या आहेत. त्याचबरोबर पात्र शेतकऱ्यांना या अनुदानाचा थेट लाभही मिळाला आहे. आता उर्वरित शेतकरी ५०,००० हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षा करत होते. आता या शेतकऱ्यांची चौथी यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे. आता यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक मदत होणार आहे.

हे पण वाचा: PM Svanidhi Yojana: अडीच हजार लाभार्थ्यांना कर्जवाटप; तिसऱ्या टप्प्यातील कर्जासाठी अर्ज करा

प्रोत्साहन अनुदानाची 4 थी यादी 14 मार्च 2023 रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे. यामुळे शेतकरी आपले नाव यादीत आहे का नाही, हे कसे जाणून घेऊ शकतात. प्रोत्साहन अनुदानाच्या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही? हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांना सीएससी (csc) पोर्टलवर जाऊन पाहू शकता.

या’ शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार | Incentive Grant

जे शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करत आहे. अशाच शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. याकरता शेतकऱ्यांनी 2019-20-21 या तीन वर्षामध्ये किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची परतफेड केलेली गरजेची आहे. तरच शेतकरी या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळवू शकतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपली पात्रता दर्शवण्यासाठी आधार केवायसी करणे देखील आवश्यक आहे.

जॉईन व्हॉट्सॲप ग्रूपजॉईन करा
जॉईन टेलेग्राम ग्रूपजॉईन करा
Farmer Loan Waive 2023

Leave a Comment