Kamgar Gharkul Yojana: राज्यातील कामगारांना स्वत:चा हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांसाठी अटल आवास योजना राबविण्यात येत आहेत.
प्राप्त माहीतीनुसार, कामगारांच्या घरकुल योजनांसाठी आता म्हाडा एजन्सी म्हणून काम करणार आहे. त्यामुळे कामगारांच्या घरांचे आराखडे मार्च अखेर सादर करावेत, अशा सूचना कामगार मंत्री तथा डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या आहेत.
Kamgar Gharkul Yojana
इमारत व इतर बांधकाम कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाला जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जमिनीवर घरकुले बांधण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेवून तातडीने आराखडे सादर करावेत, अशा सूचना कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या आहेत.
जागा उपलब्धतेसाठी काही अडचण निर्माण झाल्यास महसूल विभागाशी म्हाडाने संपर्क साधावा. ज्या कामगारांनी घरकुलासाठी नाव नोंदणी केली आहे त्यांना अन्य घरकुल योजनांमधून घरकुल मिळाले किंवा नाही याची कामगार विभागाने शहानिशा करावी. यासोबतच महानगरपालिका क्षेत्रात काम करताना महानगरपालिकेचा यामध्ये सहभाग घ्यावा, असंही ते म्हणाले.