land records: शेतजमिनीच्या शेत्रावरून अनेकदा शेतकऱ्यांमध्ये भान्न आणि वाद होत असतात. दरम्यान राज्य शासनाने (State Government) यावर आता भारी उपाययोजना आणली आहे. यापुढे शेतजमीन मोजणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने होणार आहे. ही मोजणी करण्यासाठी land records सॅटेलाईटचा वापर करण्यात येणार आहे. भूमिअभिलेख कार्यालयात रखडलेल्या सर्व जमीन मोजण्या १ जुलैनंतर सॅटेलाईटच्या (Satellite) माध्यमातून केल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती राधाकृष्ण विखेपाटील यांनी सांगितली आहे.
जमीन मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान | land records
जमिनीची मोजणी केल्यानंतर झालेल्या खुणा निशाणी शेतकऱ्यांकडून काढून टाकल्या जाणे, वारंवार जमिनीची मोजणी करावी लागणे तसेच मोजणीशी निगडित वादाचे प्रकार वाढणे या गोष्टी थांबवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. भूमिअभिलेख विभाग म्हणजेच मोजणी विभागाने हा आधुनिक उपाय शोधून काढला आहे.
सॅटेलाईटच्या माध्यमातून मतमोजणी केल्याने होणारे फायदे | land records
१) मोजणीच्या वेळेत अर्ध्या पटीने बचत होणार.
२) शेतकऱ्यांना आता अक्षांश व रेखांशासह मोजणी नकाशे मिळणार आहे.
३) मोजणी अचूक होईल.
४) मोजणीच्या खुणा मिटवल्या जाण्याची समस्या राहणार नाही.
५) मोजणीसाठी शेतकऱ्यांची होणारी त्रेधातिरपीट थांबणार.
६) मोजणीच्या खर्चात बचत होईल.
७) मोजणीमुळे होणारे वाद टळतील.
land records सध्या सर्वच क्षेत्रामध्ये नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे. यातच आता जमीन मोजणीच्या प्रक्रियेमध्ये देखील नवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव दिसून येणार आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सॅटेलाइट मोजणीमुळे शेत जमीन मोजणी विना वादाची पार पडेल व मोजणी अचूक पद्धतीने होईल.
१५ दिवसांत मोजणी पार पडणार
महत्त्वाची बाब म्हणणे यापुढे जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज दिल्यानंतर किमान १५ दिवसांमध्ये मोजणी पार पडणार आहे. नवीन तंञज्ञानामुळे अतिशय जलद गतीने जमीन मोजणी पार पडणार आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या बांध कोराकोरी व वादाला या मोजणीमुळे पुर्णविराम मिळणार असल्याचे विखे पाटील यांनी म्हंटले आहे.