MJPSKY Yojana | उरलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ कधी मिळणार?

MJPSKY Yojana | नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने प्रोत्साहन पर अनुदान देण्यासाठी एक योजना चालू केलेली आहे. त्या योजनेचे नाव महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आहे. या योजने मार्फत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार मार्फत प्रोत्साहन पर 50,000 रुपये एवढ अनुदान देण्यात येतं.

यामध्ये अनेक शेतकरी पात्र ठरलेले आहेत, व अनेक जणांची यादीत नाव आलेली आहेत. केवायसी (KYC) केल्यानंतर यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे. मात्र काही शेतकरी अजूनही असे आहे, ज्यांनी केवायसी करून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली नाही. तसेच अजूनही बरेच शेतकरी आहेत जे यादीत नाव येण्याची वाट पाहत आहेत. पुढची यादी कधी प्रसिद्ध होणार या प्रतीक्षेत आहेत.

कधी येणार पुढची यादी | MJPSKY Yojana

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने मार्फत शासनाकडून देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर लाभासाठी अनेक शेतकरी पात्र ठरले आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांची नावं अजूनही यादीत आले नाहीत. ती नावं कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण होत आहेत. अजून याबद्दल शासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर या संदर्भात माहिती मागवण्यासाठी एक आरटीआय (RTI) दाखल करण्यात आला होता.

काय होता आरटीआय | MJPSKY Yojana

याविषयी चौकशीसाठी सहकार क्षेत्राकडे आरटीआय (RTI) दाखल करण्यात आला होता. प्रोत्साहन पर अनुदान योजनेसाठी किती शेतकऱ्यांना पात्र ठरलेलं आहे, किती शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे उपलब्ध आहे आणि किती शेतकऱ्यांना बांधवांना अनुदान मिळालं आहे. याबद्दलच्या माहितीसाठी हा आरटीआय दाखल करण्यात आलता. याचं प्रश्नाचं उत्तर अजून प्रतीक्षेत आहे.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री

अमरावतीमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये या याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले, एकूण 15.50 लाख शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी 12.50 लाख शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित झालेलं आहे. उरलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांचं पडताळणी चालू आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढची प्रक्रिया होणार आहे. ही प्रक्रिया कधी पूर्ण होणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यात ही अनुदानाची रक्कम कधी जमा होणार याबाबत अजून काही माहिती मिळालेली नाही. याबाबत काही मिळाल्यास तुम्हाला नक्की कळवण्यात येईल, त्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment