PM Kisan FPO Yojana | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ‘पीएम किसान एफपीओ योजना’ (PM Kisan FPO Yojana) चालू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी 18 लाख रुपयांची आर्थिक मदत करत आहे. मात्र, यासाठी अशा शेतकरी (PM Kisan FPO Yojana) उत्पादक संघटना स्थापन कराव्या लागतील किंवा त्यात सहभागी व्हावे, ज्यामध्ये किमान 11 शेतकरी असणे आवश्यक आहे.
एफपीओमध्ये सहभागी झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळेल बाजारपेठ
पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळत आहेत. FPO (PM Kisan FPO Yojana) संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची बाजारपेठ मिळते. त्याच वेळी, ते खते, बियाणे, रसायने आणि कृषी यंत्रसामग्री यासारख्या गरजेच्या वस्तू स्वस्त दरात घेऊ शकतात. याशिवाय त्यांना बँकांकडून स्वस्त दरात कर्जही मिळू शकते.
पीएम किसान एफपीओ योजनेसाठी येथे करा अर्ज
तुम्हाला या योजनेचा (PM Kisan FPO Yojana) लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजाराच्या मुख्य वेबसाइटवर (https://www.enam.gov.in) जाऊन अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्ही FPO पर्यायाचे पेज दिसेल, जिथे क्लिक केल्यास नोंदणी किंवा लॉगिनसह नवीन पेज दिसेल. या ठिकाणी सर्व माहिती भरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय शेतकरी e-NAM मोबाईल ॲपद्वारे आणि जवळच्या e-NAM मार्केटला भेट देऊन नोंदणी करू शकता. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी आणि कल्याणासाठी सरकारने 2023-24 पर्यंत 10,000 FPO तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
शेतकऱ्यांना 3 वर्षात दिली जाते पूर्ण रक्कम पीएम किसान FPO योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकडे रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, बँक खात्याचे तपशील, जमिनीची कागदपत्रे, शिधापत्रिका, उत्पन्नाचा दाखला, मोबाइल क्रमांक आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. सरकारने पडताळणी केल्यानंतर, ही रक्कम 3 वर्षांच्या आत वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये खात्यावर जमा केली जाईल.