Solar Pump: सोलार कृषी पंप योजनेतील हे अर्ज होणार रद्द

Solar Pump

पाणी सिंचनासाठी होत असलेला डिझेलचा वापर कमी व्हावा आणि प्रदूषणावरती आळा बसावा, यामुळे अनेक कारणासाठी शासनाच्या माध्यमातून 90% अनुदान देऊन सोलार पंप देण्यात येत आहेत. याच्यासाठी राज्यामध्ये पीएम कुसुम सोलार पंप (PM Kusum Solar Pump Yojana) ही योजना राबवणे सुरु आहे. परंतु योजनेची अंमलबजावणी होत असताना याच्यामध्ये अनेक गैरप्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या माध्यमातून आणि महा ऊर्जेच्या वतीने एक गंभीर दखल घेऊन या संदर्भातील काही माहिती सांगण्यात आली आहे.

पंप (Solar Pump) बसवण्यासाठी राज्यांमध्ये कुसुम सोलार पंप या योजने आधी अटल सौर कृषी पंप योजना (Atal Solar Pump Yojana) टप्पा १ आणि टप्पा २ असे दोन टप्पे राबवण्यात आलते. याच्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप (Mukhyamantri Krushi Solar Pump Yojna) ही योजना 1 लाख सोलार पंप योजना राबवण्यात आली. पुन्हा याच्या नंतर आता 1 लाख सोलर पंपाचे उद्दिष्ट घेऊन राज्यामध्ये कुसुम सोलर पंप (Kusum Solar Pump Yojna) ही योजना सुरू करण्यात आली.

या योजनेची अंमलबजावणी आणि लाभार्थी पात्र होत असताना, ज्या शेतकऱ्यांकडे विज उपलब्ध नाही, ज्या शेतकऱ्यांना सिंचन करणे शक्य नाही किंवा जे डिझेल पंपाच्या माध्यमातून सिंचन करत आहेत, असे लाभार्थी पात्र होणे आवश्यक आहे. प्रत्येकाला किमान १ सोलार पंप बसवण गरजेचं होतं. अंमलबजावणी होत असताना अनेक सारे एजंटच्या माध्यमातून किंवा अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेमध्ये गैरगैप्रकार/फसवणूक (Solar Pump Fraud) करण्यात आला/आली आहे. एका शेतकऱ्याच्या नावावरती १, २ तसेच ३ सोलार पंप घेण्यात आले आहे आणि ही बाब आता महाऊर्जेच्या निदर्शनास आली आहे आणि याच्यामुळे कायदेशीर अशी दखल महा ऊर्जेच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.

कुसुम सोलार पंप ही योजना (Kusum Solar Yojana) राबवत असताना पूर्णपणे आधार सिडींग केल्याने, आधार संलग्न खात्यावरती किंवा आधार संलग्न नंबर नुसार त्या शेतकऱ्याची सोलार पंप देण्याची कारवाई करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना असेल किवा अटल सौर कृषी पंप यापैकी कोणतीही योजना असेल या योजनांमध्ये एवढा काही डाटा त्याच्या मध्ये घेण्यात आलेला नव्हता, यामुळे शेतकऱ्यांची ओळख पटवण खूप अवघड होत आहे आणि आता कुसुमच्या अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अर्ज देखील केले आहेत.

ज्यांच्याकडे आधी अटल सौर पंप या योजने अंतर्गत सौरपंप मिळालेला आहे व मुख्यमंत्री सौर योजने अंतर्गत सौर पंप मिळालेला आहे आणि तरी सुध्दा कुसुमच्या अंतर्गत सौर पंप मिळालेले जे शेतकरी आहे. त्यांचे इन्स्टॉलेशन होत असताना पूर्वी मिळालेले सोलार पंप काढून ठेवत आहे. त्यानंतर नवीन सोलर पंप लागल्यानंतर आपला जुना सोलार पंप विहिरीवर लावतात त्याच्यामुळे एकाच लाभार्थ्याच्या शेता मध्ये २-२, ३-३ आधीच सोलार पंप आहेत.

एकाच लाभार्थ्याच्या नावावरती गावामध्ये पाच-पाच सहा-सहा सोलर पंप बसवलेले आहेत. अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांच्या माध्यमातून महा ऊर्जाला सांगण्यात आलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची प्रक्रिया केलेली आहे किंवा अशा प्रकारचे शेतकरी चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचा इशारा महा ऊर्जेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

ज्या शेतकऱ्याकडे याच्याआधी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून लाभ घेतलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी जर अर्ज केलेला असल्यास, असे जर निदर्शनास आले तर त्या शेतकऱ्याचा अर्ज रद्द केला जाणार आहे. त्या शेतकऱ्यांनी जर पैसे भरलेले असेल आणि सर्वेची वेळेस ही जर बाब निदर्शनास आली तर मग त्या शेतकऱ्याचा अर्ज रद्द करून जी भरलेली रक्कम आहे ती रक्कम सुद्धा जप्त केली जाणार आहे. आणि त्याच्या वरती गुन्हाही दाखल होणार आहे.

याच बरोबर ज्या शेतकऱ्यांचे सोलर पंपचे इंस्टॉलेशन केलेले आहे व त्याच्या शेतामध्ये सुद्धा अशा प्रकारचे सोलार पंप निदर्शनास आले तर शासनाची फसवणूकं केल्या प्रकरणी त्या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. अशा प्रकारची माहिती महा ऊर्जेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यामुळे जे पात्र शेतकरी वंचित राहत आहे त्यांना कुठेतरी या ठिकाणी दिलासा मिळाला आहे. जो शेतकरी या योजने पासून वंचित आहे ज्याला खरंच सोलार पंपाची गरज आहे असे शेतकरी मात्र अद्याप या योजने पासून वंचित आहेत.

त्याच्यामुळे आता ही कारवाई या वंचित असलेल्या शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळवून देणार आहे. त्याच्यामुळे आपल्या नावावर जर याआधी सोलार पंप (Solar Pump Yojana) मिळालेला असेल तर आपण अर्ज करू नका आणि जर आपल्या कडे असं जर कनेक्शन असेल तर, पुढच्या प्रक्रियेमध्ये आपण सहभाग घेऊ नये, कारण जे गरजू शेतकरी सध्या विजेच्या उपलब्धते पासून वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांना किमान एकवेळ तरी याच्या मध्ये लाभमिळणं आवश्यक आहे.

4 thoughts on “Solar Pump: सोलार कृषी पंप योजनेतील हे अर्ज होणार रद्द”

Leave a Comment