Talathi Bharti | तलाठी भरतीचा मार्ग मोकळा अनुसूचित क्षेत्रात लोकसंख्येनुसार इतर प्रवर्गाला ही संधी

सहा महिन्यापासून चर्चेत असलेल्या राज्यातील तलाठी भरतीचा Talathi Bharti मार्ग आता मोकळा झाला आहे. अनुसूचित क्षेत्रातील जागांवरून असलेल्या वादावर अखेर शासनाने निर्णय घेत लेखी आदेशही जाहीर केला आहे. यामध्ये अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित जमाती सह इतर प्रवर्गालाही Talathi Bharti लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळाली असून पुढील महिनाभरात राज्यातील रिक्त असलेली 4 हजार 122 तलाठी पदे भरण्यात येणार आहेत.

पेसा क्षेत्रात सर्वच तलाठी पदे ही अनुसूचित जमाती या प्रवर्गातून भरावयाची असा राज्यपालांचा यापूर्वीचा आदेश होता. त्यानुसार राज्यातील तब्बल 19 जिल्हे हे पेसा क्षेत्रात येत असल्याने या सर्व जिल्ह्यात सरसकटपणे अनुसूचित जमाती (ST) या प्रवर्गातूनच शासकीय विभागातील तलाठी Talathi Bharti, ग्रामसेवक, कृषी सेवक, शिक्षक अशी विविध पदांची भरती करण्यात येणार होती.

परंतु अनेक जिल्ह्यात आदिवासींसह इतरही प्रवर्गाची लोकसंख्या असल्याने हा त्या लोकसंख्येवर अन्याय होता. त्या विरोधात तीव्र आक्षेप नोंदविण्यात आले. त्याची दखल घेत या निर्णयात बदल करण्याची मागणी झाल्यानंतर 2019 साली राज्यपालांनी त्याबाबत आदेशही दिले होते. यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणावर पद भरती करण्याबाबत अनुमती देण्यात आली. पण त्याबाबत शासन आदेशाची प्रतीक्षा होती त्यामुळे तलाठी भरतीची डिसेंबर पूर्वीच घोषणा होऊन एप्रिल पर्यंत भरती पूर्ण करण्याची घोषणा ही तांत्रिक कारणामुळे हवेतच विरली.

अखेर 2023 मध्ये प्रक्रिया सुरू झाली. पेसा बाबत मार्गदर्शन मागविण्यात आले. त्यामध्ये बिंदू नामावली सह इतरही काही दुरुस्त्या आहेत का? बिंदू नामावली प्रमाणे रिक्त पदे किती? रिक्त पदांमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती याची संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात आली होती.

त्यांच्याकडून अहवाल येणे प्रलंबित असल्याने भरती बाबत घोषणा करूनही ती तात्काळ करणे शासनाला शक्य झाली नव्हते. ही रखडून पडलेली भरती आता नुकताच शासन निर्णय जाहीर झाल्याने लवकरच जात प्रवर्गानुसार तलाठी पदांची फेर संख्या निश्चित करून भरती पूर्ण करण्याचे स्वतः शासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे तलाठी सतरा संवर्गाच्या भरतीचा प्रश्न निकाली निघाला आहे.

आदिवासी लोकसंख्येनुसार अशी होणार पद भरती | Talathi Bharti

  • 50% पेक्षा जास्त एसटी प्रवर्गातूनच शंभर टक्के तलाठी पदे भरणार
  • 25 ते 50 टक्के दरम्यान आदिवासी लोकसंख्येसाठी 50 टक्के पदांची संधी
  • 25% पेक्षा कमी लोकसंख्या असल्यास 25 टक्के पदे भरणार
आता सर्वसाधारण सह इतर प्रवर्गाच्या जागा वाढणार

आधी तेरा आदिवासी जिल्ह्यात शंभर टक्के पदे ST प्रवर्गातून भरली जाणार होती. त्यामुळे एकूण पदसंख्येतून ही पदे एसटी राखीव होती. परंतु आता लोकसंख्येच्या प्रमाणावर ही पदे भरली जातील. एसटी प्रवर्गाची लोकसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यात सर्वसाधारण सह एसी ओबीसी व इतर घटकांच्या जागा वाढतील.

Leave a Comment