Farmer Loan Waive 2023: ‘कर्जमुक्ती’च्या यादीत १२ हजार ९४२ शेतकरी

Farmer Loan Waive 2023: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर अनुदान लाभ योजनेतील पहिल्या यादीत जिल्ह्यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा समावेश झाला होता.

रत्नागिरी: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Farmer Loan Waive 2023) प्रोत्साहनपर अनुदान लाभ योजनेतील (Farmer Loan Waive 2023) पहिल्या यादीत जिल्ह्यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा समावेश झाला होता. यामधील १२ हजार ८८० शेतकऱ्यांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे. मात्र उर्वरित ६२ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण (Aadhar Verification) अजूनही केलेले नाही. त्यामुळे पहिली यादी १००% लाभ मिळण्यापासून वंचित राहिलेली आहे. दुसरी यादी अद्याप जाहीर न झाल्याने लाभासाठी अर्ज दाखल केलेले १० हजार शेतकरी वाट पहात आहेत.

शेतीशी निगडित कामांसाठी शेतकरी व व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून शेतकरी कर्ज घेतात. २०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आलती. राज्याच्या काही भागांत अवेळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालते. त्यामुळे मागील काही वर्षांत शेती निगडित कर्जाची परतफेड होऊ शकली नाही.

हे पण वाचा: PM Svanidhi Yojana: अडीच हजार लाभार्थ्यांना कर्जवाटप; तिसऱ्या टप्प्यातील कर्जासाठी अर्ज करा

परिणामी, शेतकरी कर्जबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दुष्टचक्रात अडकला होता. त्यामुळे त्यांना नव्याने पीककर्ज घेण्यास काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना २०१९ मध्ये महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली; पण अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड नियमित केली होती. अशा शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. | Farmer Loan Waive 2023

त्यामुळे नियमित कर्जफेड परत केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपयांची प्रोत्साहन अनुदान देणारी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान लाभ देणारी योजना लागू केली. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून ही योजना अमलात आणली आणि नियमित परतफेड केलेले कर्ज प्रोत्साहन अनुदान असलेल्या ५० हजारांपेक्षा कमी रकमेचे असल्यास त्यांनी उचल करून परतफेड केलेल्या रकमे एवढी रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्याचे जाहीर केले.

प्रोत्साहन अनुदान लाभ योजनेची पहिली यादी जाहीर होऊन महिना संपला; मात्र शासनाने अद्याप दुसरी यादी जाहीर केली नाही. प्रोत्साहन लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील २३ हजार ५९० शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्जही केला आहे. यामधील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश आहे. अद्याप अजूनही १० हजार ७४८ शेतकऱ्यांची नावे आलेली नाही. दुसऱ्या यादीत त्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

लाभ थेट खात्यात जमा | Farmer Loan Waive 2023

रत्नागिरी जिल्ह्यात याची 1 ली यादी शासनाने जाहीर केली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा समावेश होता. पहिल्याच दिवशी ९ हजाराच्या वर शेतकऱ्यांच्या खात्यात ही प्रोत्साहन रक्कम जमा झालती. नोव्हेंबर अखेरपर्यंत १२ हजार ८८० शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली आहे. एकूण ३१ कोटी ८३ लाख रुपये एवढी रक्कम वर्ग झाली आहे. मात्र शिल्लक राहिलेल्या ६२ शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केले नाही. त्यामुळे अजून त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही.

जॉईन व्हॉट्सॲप ग्रूपजॉईन करा
जॉईन टेलेग्राम ग्रूपजॉईन करा
Farmer Loan Waive 2023

Leave a Comment