Mini Tractor Anudan Yojana: मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी मिळणार ९० % अनुदान

Mini Tractor Anudan

शेतकरी बांधवांनो समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात. यामध्ये अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर व गटई स्टॉल वाटप Tractor yojana योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भाविषयी दोन महत्त्वपूर्ण अपडेट आहेत. लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयं सहायता बचत गटांना ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी अर्ज सुरू झाले आहे. हे अर्ज १५ जानेवारी २०२३ पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या जे स्वयंसहायता बचत गट आहे, ‘ज्याच्यामधील 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असतील’ अशा बचत गटांना ९०% अनुदानावरती अर्थात तीन लाख पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान हे मिनी ट्रॅक्टरचा खरेदीसाठी दिले जात आहे. ज्याच्यामध्ये लाभार्थ्यांना९ hp पासून १८ hp अश्वशक्ती पर्यंत ट्रॅक्टर खरेदी करू शकतात.

Tractor Anudan Yojana

या ट्रॅक्टर खरेदीसाठी जास्तीत जास्त ३ लाख १५ हजार रुपये एवढे अनुदान दिले जाऊ शकते. त्याच्यामध्ये ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर ५०% आणि आरटीओ कडे नोंदणी झाल्यानंतर उर्वरित ५०% अशा प्रकारांमध्ये हे अनुदान देण्यात येऊ शकते आणि याच्यापेक्षा जास्त खरेदी करायची असल्यास उर्वरित जो काही खर्च असेल तो त्या ठिकाणी लाभार्थ्यांना स्वतः भरावा लागेल. यासाठी १५ जानेवारी २०२३ पर्यंत हे अर्ज स्वीकारले करण्यात येणार आहेत.

मित्रांनो याच प्रमाणे अनुसूचित जातीमधील गटई कामगारांना १००% अनुदानावरती गटई स्टॉल साठी सुद्धा अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार आहेत. हे अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२३ आहे. लातूर जिल्ह्यातील जे गटई कामगार असतील, अशा गटई कामगार हा अर्ज करू शकणार आहेत, याच्यासाठी अर्जदाराचे ग्रामीण भागासाठी उत्पन्न हे ४० हजार रुपये आणि शहरी भागासाठी जो उत्पन्न ५० हजार रुपये असणे आवश्यक असणार आहे.

Tractor Anudan Yojana

तसेच गटई स्टॉल लावण्याच्या जागेचा ८ अ उतारा किंवा भाडे करार पत्र १०० रुपयांच्या बॉण्ड पेपर वरती नमुन्यातील करारनामा अशा प्रकारच्या काही महत्त्वपूर्ण अशा कागदपत्रासह आपल्याला हा अर्ज 5 जानेवारी 2023 पर्यंत आणि ट्रॅक्टरच्या अनुदानाकरता 15 जानेवारी 2023 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये जमा करणे आवश्यक असणार आहे.

तुम्ही जर या प्रवर्गातील असाल तर या योजनेसाठी पात्र असणार आहे. तर आपण या योजने करता अर्ज करू शकतात. ही योजना साधारणपणे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या माध्यमातून एक तारीख निश्चित करून अर्ज मागवले जात आहेत. सध्या लातूर जिल्ह्याकरता अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या जिल्ह्याचे अर्ज मागवले नाहीत अशा त्च्यायाबद्दलची माहिती सुद्धा आपण या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल त्यासाठी आजच आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप

जॉईन टेलेग्राम ग्रुप

2 thoughts on “Mini Tractor Anudan Yojana: मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी मिळणार ९० % अनुदान”

Leave a Comment