Insurance coverage: डॉ. नारनवरे: ऊसतोड कामगारांच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम
राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा मार्फत येत्या काळात अधिकाधिक योजनांचा लाभ देणार आहे. त्यासाठी ऊसतोड कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करायचा असून 10 लाख ऊसतोड कामगारांना 5 लाख रुपयांचे विमा (health insurance coverage) संरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहे.
संलग्न महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या
राज्यातील पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाची ऊसतोड कामगारांच्या (accident insurance coverage) विविध प्रश्नांबाबत पुण्यामध्ये गुरुवारी (ता. ९) बैठक आयोजित करण्यात आलती. त्यावेळी आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ही माहिती सांगितली आहे. या वेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त रवींद्र कदम पाटील, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळुंकी, प्रा. डॉ. सुभाष जाधव, प्रा. आबासाहेब चौगुले, नामदेव राठोड, सय्यद रजा, अंगत खरात, पांडुरंग मगदूम, रामचंद्र कांबळे, किशोर राठोड ई. हजर होते.