Crop loan | काही शेतकरी नवीन हंगामामध्ये मशागतीसाठी पीककर्जावर अवलंबून राहत असतात. हे पीककर्ज विविध बँकांच्या मार्फत दिले जातं. हे पीक कर्जवाटप करण्यासाठी बँकांना लक्ष्यांक म्हणजे टार्गेट दिले जातं.
Crop loan: यामध्ये ग्रामीण बँका, सरकारी बँका, खाजगी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँका इत्यादी बँकांचा समावेश असतो. यानुसार बँका शेतकऱ्यांना कर्जवाटप करतात. 2022-23 या वर्षासाठी नाशिक जिल्ह्याला पीक कर्जवाटप लक्ष्यांक 4 हजार 16 कोटी रुपये एवढा होता. यापैकी 31 मार्च 2023 पर्यंत 3 हजार 426 कोटींच्या पीककर्जाचं वाटप जिल्ह्यामध्ये झालेलं आहे.
हे पण वाचा: Weather पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा! हवामान विभागाने वर्तवला अंदाज
गतसाली सर्वाधिक लक्ष्यांक | Crop loan:
मागच्या वर्षी पीककर्ज वाटपासाठी सर्वाधिक लक्ष्यांक सरकारी बँकांना दिला होता. मात्र त्या बँकाकडून तो पूर्ण झाला नाही. यामध्ये चालूवर्षी वाढ करण्यात आली आहे. त्या खालोखाल खाजगी बँकांना हा लक्ष्यांक देण्यात आला आहे. त्यांनी 113% वाटप पूर्ण केले आहे.
तर ग्रामीण बँकांचा Crop loan आकडा फक्त 11 कोटी असला तरी देखील त्यांनी तो पूर्ण करून सर्वाधिक टक्केवारी 155 एवढी ठेवली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्वांत कमी वितरण केले आहे. तर चालूवर्षी लक्ष्यांक कमी केलेला आहे.
हे पण वाचा: Free Flour Mill Yojana Maharashtra: मोफत पीठ गिरणी योजना महाराष्ट्र येथे अर्ज करा
जिल्ह्यातील पीककर्ज वितरणाची स्थिती
Crop loan: सरकारी बँकांना 2709.6 कोटी एवढा लक्ष्यांक देण्यात आलता. यामधील 2198.7 कोटी रुपये वाटप झाला आहे. 81.15 टक्के एवढी ही टक्केवारी आहे. 2023-24 साठी सरकारी बँकांचा लक्ष्यांक 2764.8 कोटी रुपये एवढा आहे. खाजगी बँकांना 657.7 कोटी एवढा लक्ष्यांक देण्यात आला होता. यापैकी 746.2 कोटी Crop loan रुपये वाटप झाला आहे. 113.45 टक्के एवढी ही टक्केवारी आहे. 2023-24 साठी खाजगी बँकांचा 802.5 कोटी रुपये लक्ष्यांक आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांना 637.3 कोटी एवढा लक्ष्यांक देण्यात आला होता. यामधील 464 कोटी रुपये साध्य झाला आहे. 72.80% ही एवढी टक्केवारी आहे. 2023-24 साठी जिल्हा मध्यवर्ती बँकांचा 615 कोटी रुपये एवढा लक्ष्यांक आहे.