Anganwadi Bharti | राज्यात २०,००० अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती होणार?

Anganwadi Bharti Maharashtra 2023

महाराष्ट्र, राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी (Anganwadi Bharti Maharashtra) मान्यता मिळालेली असून लवकरच ही भरती घेण्यात येणार आहे.

Anganwadi Bharti Maharashtra 2023

याबरोबरच मानधनवाढीसह विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग, नवीन मोबाईल आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये सांगितले आहे.


राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक घेण्यात आली असून, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना आणि समितींचे पदाधिकारी या बैठकीला हजर होते.

२० हजार १८६ एवढ्या पदांच्या भरतीसाठी मान्यता मिळाली
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी एलआयसीकडे शासनाने १०० कोटी एवढा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या विषयाच्या प्रलंबित प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करुन संबंधितांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजार १८६ पदांच्या भरतीसाठी (Anganwadi Bharti Maharashtra) मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेत.

बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले?
अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विभागाला दिल्या आहे. आढाव्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे वर्ग भरविण्याच्या संदर्भात त्यांना आदेश देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पोषण आहाराचा दर वाढविण्या विषयावर केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच त्यामध्ये वाढ केली जाईल, असा विश्वास व्यक्त करतांनाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने भाऊबीज दिल्याबद्दल आणि गणवेशाचे पैसे थेट खात्यावर जमा केल्याबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार वक्त केले आहे. या बैठकीमध्ये पोषण ट्रॅकर ॲप, मानधनवाढ, रिक्त पदे आदी बाबींवर चर्चा झाली आहे.

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजार १८६ पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री (eknath shinde) यांनी यावेळी दिले.

तर, अशाप्रकारे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजार १८६ पदांच्या भरतीला (Anganwadi Bharti Maharashtra) मान्यता देण्यात आली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत, यासंबंधीचे सर्व अपडेट्स तुम्हाला आमच्या https://www.helloshetkari.com/ वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

Leave a Comment